केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिरच्या"रजत स्मरणदीप - २५ वर्षाचा तेजोमय ज्ञानदीप"भव्य दिव्य रौप्य महोत्सवाचे थाटात उद्घाटन संपन्न...


 
केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिरच्या"रजत स्मरणदीप - २५ वर्षाचा तेजोमय ज्ञानदीप"भव्य दिव्य रौप्य महोत्सवाचे थाटात उद्घाटन संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

स्थानिक जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर च्या रजतस्मरणदीप - २५ वर्षाचा  तेजोमय ज्ञानदीप रौप्य   महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले.यावेळी मंचावर बुलढाणा अर्बन को. ऑप. चे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर,  आमदार डॉ .संजय कुटे, डॉ. किशोर केला, किसनलाल केला, स्त्री शिक्षण संस्था धुळेच्या अध्यक्षा अलकाताई बियाणी, ओमप्रकाश केला,सहकार विद्या मंदिर च्या मुख्य संयोजिका डॉ. स्वाती केला, डॉ.दलाल साहेब उपस्थित होते. तसेच सहकार महर्षी राधेश्याम चांडक संस्थापक अध्यक्ष बुलढाणा अर्बन यांनी व्हेडिओ फीत च्या माध्यमाने शाळेच्या या रौप्य महोत्सवकरिता आभासी पद्धतीने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते गणपती पूजन , वृक्ष पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. तदनंतर गणपती वंदना, सरस्वती वंदना , गुरुवंदना व स्वागत गीतांची भावविभोर नृत्य प्रस्तुती झाली.केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर व बुलढाणा अर्बन सांस्कृतिक वारसा, मूल्यसंवर्धन व चांगला पाल्य घडविण्याचे सतत कार्य करतो आहे,त्याचबरोबर सहकार  म्हणजे सभासदांच्या हितासाठी व फायद्यासाठी आहे असे मत बुलढाणा अर्बन चॅरिटेबल क्रेडिट को ऑफ चे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी आपल्या अध्यक्षीय  भाषणात  व्यक्त केले. २५ वर्षांपूर्वी सहकार विद्या मंदिराचे लावलेले रोपट आज नवनवीन तंत्रज्ञान व कौशल्य विकसित करून पुढे जात आहे, असे मत डॉ. किशोर केला यांनी स्वागतपर भाषणात व्यक्त केले तर कार्यक्रमाचे डिजिटल उद्घाटन आमदार डॉ.संजय कुटे यांनी केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिराने २५ वर्षाचा प्रवास पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व विविध क्षेत्रात लोकांना पुढे जाण्यासाठी बुलढाणा अर्बनची मदत झाली असे त्यांनी सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या स्त्री शिक्षण संस्था धुळे च्या अध्यक्षा अलकाताई बियाणी यांनी मार्गदर्शनातून विविध उपक्रमा बद्दल शाळेचा गौरव करून शाळेला २५ वर्षे झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून माननीय डॉ.स्वाती केला यांनी शाळेच्या सर्व वैशिष्ट्यांची संपूर्ण माहिती दिली व शाळेची २५ वर्षे पूर्ण झाल्याचे व पाहण्याचे  भाग्य भाईजींमुळे मिळाले असे त्यांनी सांगितले. यावेळी बुलढाणा अर्बन चे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय डॉ. सुकेश झंवर यांचा सत्कार  सोहळा पार पडला त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या रौप्य महोत्सवानिमित्त अनेक विद्यार्थी ,शिक्षक ,आजी-माजी विद्यार्थी ,शिक्षक यांनी शाळेविषयी असलेल्या प्रेम ,आपुलकी शब्दांनी व्यक्त करून शाळेने एक स्मरणिका तयार केली "रजत स्मरणदीप- २५ वर्षाचा तेजोमय ज्ञानदीप"या  स्मरणिकेचे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते  विमोचन करण्यात आले.यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध दालन तयार करण्यात आले होते त्यांचे उद्घाटन करण्यात आले. जसे विविध प्राचीन अर्वाचीन भांड्यांची माहिती मिळाली "भांड्यांची दुनिया" दालनातून ,”नादब्रह्म “ दालनात यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने  बनवलेल्या विविध वाद्यांची ओळख झाली. विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अनेक टीचिंग एड्स “ ज्ञानविश्व” दालनात बघता आली. विद्यार्थ्यांच्या हस्तकला, चित्रकला, रंगकलानी “कला विश्व “ दालन सजले. तर “विंज्ञान विश्व” दालनातून विज्ञानाची जिज्ञासा पूर्ण झाली. अशा  सर्व  दालनांचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मान्यवरांनी सर्व दालनांचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांनी केलेल्या या नाविन्यपूर्ण कला कृतींबद्दल विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात क्रीडा ज्योत यामध्ये विद्यार्थ्यांनी परेड, लाठी काठी ,कराटे, डंबेल, योगा, बलून ड्रिल, स्ट्रीक ड्रिल , मनोरा अशा विविध पद्धतीच्या कवायती सादर सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे सादर केलेल्या कवायतेबद्दल कौतुक केले.यानंतर तिसरे सत्र म्हणजे " रंगतरंग सांस्कृतिक ज्योत"यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध  नृत्य ,नाटिक प्रस्तुत केल्या यामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर शाळेची “२५ वर्षाची यशोगाथा “  सांगणारा शाळेच्या मुख्य संयोजिका माननीय डॉ स्वातीताई केला   लिखित पोवाड्यातून शाळेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतची शाळेची यशोगाथा शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सादर केली.यावेळी केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर चे प्राचार्य विनायक उमाळे, प्राचार्य प्रकाश भुते, प्राचार्य विनोद ईश्वरे, प्राचार्य राजेश लोहिया, प्राचार्य रविंद्र घायल, प्राचार्य योगेश घाटोळे, सर्व शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर   कर्मचारी, बुलढाणा अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पसायदानाने या सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक साकेत गिरजापुरे, स्वाती वैष्णव ,वैष्णवी चतारे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमासाठी शाळेतील संपूर्ण शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वी केला.ज्ञानज्योत वाचन यात्रा ग्रंथ दिंडी ,अमृत अभिष्टचिंतन ,रजत स्मरणदीप सोहळा ,ज्ञानज्योत दालन, सांस्कृतिक ज्योत ,रजत स्मृती माजी विद्यार्थी संमेलन अशा विविध रंगीबिरंगी कार्यक्रमाने "रजत स्मरणदीप 25 वर्षाचा तेजोमय ज्ञानदीप" रौप्य महोत्सव सजविला गेला .

Previous Post Next Post