टीव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या घाटाखालील जिल्हाध्यक्षपदी फहीम देशमुख,सचिवपदी प्रा. प्रफुल खंडारे, कार्याध्यक्षपदी संदीप वानखडे तर सहसचिव पदी राजेश बाठे यांची निवड...!
अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी...
बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिष्ठित टीव्ही अँड डिजिटल मीडिया असोसिएशनची बुलढाणा जिल्हा कार्यकारणीची रविवारी अविरोध निवड करण्यात आली आहे. युसीएन न्यूज चे जिल्हा प्रतिनिधी फहीम देशमुख यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा तर सचिव पदाची जबाबदारी जय महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. प्रफुल खंडारे तर कार्याध्यक्षपदी संदीप वानखडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या अध्यक्षतेत आज ही जम्बो कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.
खामगाव येथील विश्राम भवनात पार पडलेल्या या द्विवार्षिक बैठकीच्या प्रमुख उपस्थितीत न्यूज १८ लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राहुल खंडारे, वरिष्ठ पत्रकार फारुक सर, ओटीपी न्यूजचे श्रीधर ढगे, लोकशाही मराठीचे संदीप शुक्ला, एबीपी माझा चे डॉ.संजय महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीमध्ये सर्वप्रथम स्वर्गीय पत्रकार गजानन कुलकर्णी आणि नागोराव अनोकार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर उपस्थित पत्रकारांनी आपले विचार मांडले. यावेळी घाटावरील बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा साम टिव्ही चे जिल्हा प्रतिनिधी संजय जाधव तर घाटाखालील जिल्हाध्यक्ष पदी युसीएन न्यूज चे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी फहीम देशमुख यांच्या नावावर चर्चा होऊन अभिरोधपणे त्यांची निवड करण्यात आली. याबाबतची घोषणा असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांनी केली. यांनतर उर्वरित कार्यकारणी च्या विविध पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. बैठीचे प्रास्ताविक श्रीधर ढगे, सूत्र संचलन प्रा. प्रफुल्ल खंडारे, तर आभार अमोल गावंडे यांनी मानले.
____________________________________________
♦️अशी आहे कार्यकारणी -
फहीम देशमुख अध्यक्ष,संदीप शुक्ला,सचिन ठाकरे उपाध्यक्ष,संदीप वानखडे जिल्हा कार्याध्यक्ष,प्रफुल्ल खंडारे सचिव,राजेश बाठे जिल्हा सहसचिव, ईश्वर ठाकुर सहसचिव, डॉ. संजय महाजन कोषाध्यक्ष, संतोष तायडे, संदीप पाटील जिल्हा समन्वयक जका खान, गणेश सवडकर जिल्हा संघटक,आकाश शिंदे शिवाजी भोसले प्रसिद्धी प्रमुख,राजीव वाढे, सागर झणके सोशल मीडिया प्रमुख, देवानंद सानप, शेख रियाज आंदोलन समिती प्रमुख, जिल्हा प्रवक्ता म्हणून श्रीधर ढगे,अमोल गावंडे राहुल खंडारे, सल्लागार सदस्य मो.फारुख सर तर कार्यकारणी सदस्य म्हणून युवराज वाघ, कासीम शेख, वासिम शेख,निलेश राऊत, शेख तंजीम, प्रवीण मोरे, राजवर्धन शेगोकार,अनिल गोटी, मुबारक खान, सुनील मोरे, समीर शेख, मोनाली वानखडे, राजकुमार व्यास, महेंद्र बनसोड, रवी शेगावकर, ज्ञानेश्वर ताकोते, ददगाळ, कुणाल देशपांडे, ईश्वरसिंग ठाकूर, दीपक मोरे, विजय हिवराळे,शिवदास सोनोने, विजय वानखडे, पुरषोत्तम भातुरकर,संतोष करे,गणेश पानझाडे, देविदास खनपटे,गणेश गिऱ्हे,आनंद जवंजाळ,विनोद वानखडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
__________________________________________
इतर पदांवर नियुक्तीचे अधिकार जिल्हा कार्यकारणीकडे पार पडलेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील काही रिक्त असलेल्या पदांवर याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका अध्यक्ष नियुक्ती करण्यासंदर्भात जिल्हा कार्यकारणी निर्णय घेईल असे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांनी जाहीर केले. त्यामुळे पुढील काही दिवसात जिल्हा कार्यकारणी जिल्हा दौरा आयोजित करून या नियुक्त जाहीर करणार असल्याची माहिती नवनियुक्त जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख यांनी सांगितले.