मोताळ्यात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट – "माझं कुकू, माझा देश" घोषणांनी बसस्थानक परिसर दणाणला...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात उघडकीस येऊनही केंद्र सरकार बीसीसीआयला पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याची परवानगी देत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने मोताळा बसस्थानकासमोर आज तीव्र आंदोलन करण्यात आले."माझं कुकू, माझा देश" या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. महिलांनी हातात फलक, बॅनर घेत पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.या आंदोलनात शिवसेना प्रवक्ता ॲड. जयश्री शेळके यांचाही सहभाग होता. त्या म्हणाल्या, "पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास परवानगी देऊन केंद्र सरकारने शहीदांच्या बलिदानाचा अपमान केला आहे. सीमा ओलांडून हल्ले करणाऱ्या देशाशी क्रीडा संबंध ठेवणे म्हणजे देशभक्ती नव्हे, तर देशाशी गद्दारी ठरते."आंदोलनादरम्यान महिलांनी सरकारला प्रतीकात्मक स्वरूपात कुंकू पाठवून संताप व्यक्त केला. यावेळी तालुक्यातील महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वातावरण देशभक्तीपर घोषणांनी भारावून गेले.यावेळी तालुकाप्रमुख महिला आघाडी कल्पनाताई पुरी, प्रियंकाताई क्षीरसागर, सरपंच मीराबाई बहादरे, संगीताताई कोळसे, ताराबाई कोळसे, सुरेखा महाजन, राजकन्या गवई, अरुणाताई महाजन, जिजाबाई महाजन, संध्याताई ढोण, वैष्णवीताई ढोण, केसरबाई वानखेडे, जिजाबाई गवई, केसरबाई वानखेडे, कमलबाई बुंदे,सुनीता राठोड, भारती कोल्हे, मयुरी शिंदे, उज्ज्वला आसने, राधा राजपूत, माधुरी पट्ठे,निशा हिवाळे, मयुरी शिंदे, शालिनी खराटे, सरला बिचकुले, सविता अहिरे, सिताबाई बिचकुले, फुलाबाई सोन्नर, सखुबाई तमनर, मखाबाई बिचकुले, सिता मार्कंड, पंचफुला बिचकुले, लताबाई राठोड, संगीताबाई पवार, सुनिता पवार, इंदुबाई चव्हाण, सुशीबाई चव्हाण, सुशीलाबाई पवार, मैनाबाई पवार, सखुबाई चव्हाण, सुमित्रा राठोड यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.तसेच तालुकाप्रमुख विजय इंगळे, शहर प्रमुख रमेश धुनके, डॉ.शरद काळे,हमीद कुरेशी,अबरार कुरेशी,विनोद ढोण, अक्षय जवरे, काशिना बिचकुले, विनोद वानखेडे, योगेश महाजन यांच्यासह गावातील मंडळी उपस्थित होती.