दि न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहात साजरी...


 
दि न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहात साजरी...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद येथील दि न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिव्यक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अविनाश कुलकर्णी, उपमुख्याध्यापक शेख सलीम, पर्यवेक्षक ओंकारराव तायडे तसेच क.म.विद्यालयाचे पर्यवेक्षक सुहास वाघमारे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्यायजींच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून देताना “एकात्म मानववाद” या त्यांच्या विचारसरणीचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी मनोज सराफ सर यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार मांडले. त्यांनी त्यांच्या साध्या व नि:स्वार्थी जीवनशैलीवर प्रकाश टाकत, गरीब व वंचित घटकांसाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे वर्णन केले. उपाध्यायजींची कार्यपद्धती ही आजच्या तरुणांसाठी आदर्श असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांनी देशभक्तीपर गीत, निबंध स्पर्धा व भाषण सादर करून पं. उपाध्यायजींच्या कार्याचा गौरव केला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयातील शिक्षकांनी केले तर संचालन सुधाकर गाठे सर यांनी  केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पं. दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त घेतलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

Previous Post Next Post