आस्की किड्स च्या विद्यार्थ्यांची विविध खेळ स्पर्धामध्ये नेत्रदीपक कामगिरी...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट तालुक्यातील सर्वपरिचित गुणवत्तापूरक शैक्षणिक संस्था म्हणून आस्की किड्स पब्लीक स्कूल ने आपला ठसा उमटवला आहे. दिवसागणिक शाळेच्या वतीने सर्वांगीण विकासासाठी देण्यात येणाऱ्या शिक्षणाची प्रचीती सर्व विद्यार्थी, पालक आणि प्रत्येक समाजघटकाला येत आहे. त्याचे कारण म्हणजे आस्की किड्स चे विद्यार्थी शैक्षणिक पुस्तकी प्रगतीसोबत, वक्तृत्व, परिसंवाद, विविध स्पर्धा परीक्षा, क्षेत्रभेट इत्यादी मध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवत आहेत. अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण सिद्धता विद्यार्थ्यांनी तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावर झालेल्या विविध क्रीडा स्पर्धेत करून दाखवली.ज्यामध्ये वर्ग १० वी चे हमजा पटेल - कुस्ती, गिरीधर दाभाडे - १०० मीटर रनिंग, चैतन्य बोंद्रे - ८०० मीटर रनिंग, आराध्य लाडोळे, शिवपाल बेठेकर, गिरीधर दाभाडे, चैतन्य बोंद्रे - ४०० मीटर रिले यांची तर वर्ग ९ आणि ८ चे अनुक्रमे खुशाली भास्कर - गोळाफेक आणि राजदत्त डिक्कर - बुद्धिबळ यांनी जिल्हास्तरावर विजयी मजल मारली.तसेच वर्ग १० चे हमजा पटेल - वेट लिफ्टिंग, मिथिलेश अकर्ते - रायफल शुटिंग, प्राची कुटे - तायक्वांडो आणि वर्ग ९ चे गौरी झामरे - तायक्वांडो यांनी विभागस्तरावर मजल मारली.सदर यशासाठी विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रम आणि क्रीडा सराव यांच्या मध्ये समतोल साधत क्रीडा शिक्षक प्रशांत रंधे सर आणि जिग्नेश चावडा सर यांच्या मार्गदर्शनात सराव केला. आणि यश खेचून आणले. सदर स्पर्धा यशस्वीपणे पूर्णत्वास जाण्यासाठी शाळेचे नितीनजी झाडे यांचे सर्व प्रकारचे सहकार्य आणि प्राचार्य नेहा झाडे मॅम आणि पर्यवेक्षक पवन चितोडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांनी पुढे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या.