शाळांना शिक्षक मिळेपर्यंत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करू नका वंचित बहुजन आघाडीची मागणी...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातून बदली झालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांन एवढे शिक्षक उपलब्ध करून द्या शिक्षक उपलब्ध न झाल्यास बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करू नका या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १२ सप्टेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी यांना दिले. वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष रमेश नाईक यांच्या नेतृत्वात शिक्षक बदली संदर्भात निवेदन देण्यात आले. पंचायत समिती अंतर्गत शिक्षक जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची बदली झाली असून बदली झालेल्या शिक्षकांची संख्या २८ एवढी असून इतर तालुक्यातील बदलून येणाऱ्यांची संख्या मात्र जेमतेम ९ इतकी आहे. त्यामुळे ही तुलना पाहता जळगाव जामोद पंचायत समितीला येणारी शिक्षकांची संख्या फार अल्प असून यामुळे अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया खंडित होऊ शकते. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या पाहता शिक्षकांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे जोपर्यंत इतर तालुक्यामधून आपल्या तालुक्याला शिक्षकांचा आकडा समाधानकारक येत नाही तोपर्यंत पंचायत समितीमधील जिल्हा परिषद शिक्षकांना कार्यमुक्त करू नये. कार्यमुक्त केल्यास वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांना देण्यात आला आहे.निवेदन देते वेळी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष रमेश नाईक,ज्येष्ठ नेते साहेबराव भगत, ता महासचिव श्रीकृष्ण गवई,जिल्हा सदस्य स्वप्निल गवई,ज्येष्ठ नेते बाबूरावजी तायडे,ज्येष्ठ नेते अताउल्ला खान, भारतीय बौद्ध महासभा ता. अध्यक्ष जगदीश हातेकर, ता उपाध्यक्ष प्रमोद कोकाटे,तालुका सचिव सुरेश वाघोदे, ता उपाध्यक्ष गुणवंत मेटांगे,शहर अध्यक्ष आझम कुरेशी,सुनील इंगळे,लोकपाल भगत ,सुनील भटकर अमोल तायडे धम्मपाल निंबाळकर संतोष वारे दादाराव धनगर योगेश वाकोडे आत्माराम वाकोडे ,दामू सपकाळ,सुभाष शेगोकार,शाहीर अनिल हेलोडे,ज्ञानेश्वर कोकाटे,भास्कर जुंबळे, बाळू तायडे, सुदाम गवई, शांतशिल वानखडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.