श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन उत्साहात संपन्न...


 
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन उत्साहात  संपन्न...

 जळगाव जामोद प्रतिनिधी...

श्रीपाद  कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोद येथे दिनांक 09 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने स्वयंशासनाचे आयोजन करण्यात आले .सुरुवातीला स्वयंशासना अंतर्गत  प्राचार्य पद भूषविणारी विद्यार्थिनी कु.वैष्णवी मऱ्हे, पर्यवेक्षक कु.नम्रता कराळे यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन  यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले.शारीरिक शिक्षकाची जवाबदारी पार पाडत असताना सोपान फासे या विद्यार्थ्याने आदेश, सूचना देत सामुहिक राष्ट्रगीत, राज्यगीत घेतले.अधिक्षक कु.अंजली मांडोकार, लिपिक कु.दिव्या अहिर,कु. दिव्या तायडे, तर शिपाई पदाची जवाबदारी रोहन तायडे, सोहन अंभोरे, हर्षद गायकवाड या विद्यार्थ्यांनी पार पाडली . 23 विद्यार्थिनी व एक विद्यार्थी यांनी विविध विषयाचे क. म. वि.शिक्षक म्हणून अध्यापन केले .शेवटी समारोपिय कार्यक्रमात  कु.कोमल नळकांडे, गौरी लोखंडे, निता गिरी, प्रतिभा राठोड, लक्ष्मी माठे, अंजली मांडोकार, रेणुका ठाकरे, मयुरी गिरी, मुक्ता फासे.दिव्या अहिर, नम्रता कराळे, वैष्णवी मऱ्हे, तसेच हर्षल राठोड, सोपान फासे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात प्रशासन व अध्यापन करतांना एक वेगळा अनुभव मिळाल्याने आजचा दिवस खूप काही शिकवून गेल्याचे सांगितले. यानंतर   कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.गिरीश मायी, अधिक्षक संजय गाडेकर ,पर्यवेक्षक प्रा. जी. एस. वानखेडे  व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.राजीव देवकर यांनी आपले विचार मांडले. प्रा.ऋषिकेश कांडलकर व प्रा.विनोद बावस्कार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमासाठी  प्रा.रामेश्र्वर सायखेडे सर्व प्राध्यापक वृंद तसेच  समाधान निलजे ,शिक्षकेतर कर्मचारी बंधू ,विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन प्रा. गणेश जोशी तर आभार प्रदर्शन प्रा. निलिमा भोपळे यांनी केले . शेवटी विद्यार्थ्यांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. आणि त्यानंतर   कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous Post Next Post