● आ. डॉ. संजय कुटे यांची शेगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयास अचानक भेट●डायलिसिस युनिटसह आरोग्य सेवांची पाहणी● शासकीय रुग्णालये ही समाजाची जीवनरेखा – आ डाॅ संजय कुटे● शेगाव उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवांची पाहणी; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय, शेगाव येथे आ. डॉ. संजय कुटे यांनी आज अचानकपणे भेट देऊन रुग्णालयातील सुविधा व सेवा यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी डायलिसिस युनिट, एक्स-रे विभाग, सिटी स्कॅन सेंटर, रक्तपेढी तसेच अतिदक्षता विभागाचा सविस्तर आढावा घेतला.शासकीय रुग्णालये समाजातील सर्व घटकांसाठी आरोग्यसेवेचे आधारस्तंभ असून कमी खर्चात व विनामूल्य उपचार उपलब्ध करून देतात. येथे तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, विविध आजारांवरील आवश्यक चाचण्या, औषधोपचार तसेच आपत्कालीन सुविधा मिळतात. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागातील रुग्णांसाठी ही केंद्रे जीवनरेखा ठरतात.रुग्णालयातील सेवा दर्जा उंचावण्यासाठी व रुग्णांची काळजी अधिक प्रभावीपणे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ. डॉ. कुटे यांनी यावेळी सांगितले. सक्षम आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य संरक्षण अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सर्वांनी शासकीय आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा आणि आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी स्विय सहायक निलेश शर्मा वैद्यकीय अधीक्षक डाॅ अमोल नाफडे व इतर उपस्थित होते.