शासकीय अनुदानीत शेतकरी अवजार खरेदीची अंतिम तारीख वाढवुन द्या -राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार )पक्षाची मागणी.
जळगाव जामोद प्रतिनिधी...
महा DBT वर सध्या चालू असलेली राज्य कृषि यांत्रिकीकरन योजना 2025 कृषि उप अभियान तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजना यांची शेवटची तारीख ही 21 सप्टेम्बर 2025 ही आहे. परंतु नव्याने लागू होणारे GST धोरण हे 22 सप्टेम्बर पासुन लागू होणार असुन या योजनेची अंतिम तारीख नवीन GST धोरण लागू होईपर्यंत वाढवुन देण्यात यावी. जेणेकरुन नवीन कमी झालेल्या GST धोरणाचा लाभ शेतकर्याना घेता येईल.अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षामार्फ़त जळगाव जामोद तहसीलदार यांच्यामार्फ़त कृषि मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव, तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ,तालुका कार्याध्यक्ष महादेव भालतडक,अधि. मोहसिन खान, आशिष वायझोडे, दत्ता डिवरे, संतोष श्रीराम वायझोडे, अरुण बावस्कार,रामकिसन डांगे, राजु बावस्कार, शंकर जामोदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.