सावरपाणी रस्त्यावर येजा करणारे करतात तारेवरची कसरत...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
मेळघाट मधिल धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यातील काही गावाच्या ठिकाणीचे रस्ते एकदम खंडेमय झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.तरीही येथिल राजकीय पदाधिकारी झोपेचे सोंग घेवून झोपलेले दिसुन येत आहे.सविस्तर माहिती नुसार चिखलदरा तालुक्यातील सावरपाणी हा गाव एकदम दुर्गम भागात येत असुन या गावातील गर्भवती महिलांना सावरपाणी ते चिचोंना फाटा या तिन किलो मिटरच्या खंडमय रस्तावरुन नेत असताना गाडी चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने येथिल गर्भवती महिलांच्या जिवाला कमि जास्त होवू शकतो.जिवाचे कमि जास्त झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न सावरपाणी गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.तसेच या रस्त्यावर येजा करणारे राजकीय पदाधिकारी तसेच अधिकारी यांना हा खंडेमय झालेला रस्त्यावर दिसत नाही का? असा पण प्रश्न उपस्थित केला जात आहे.या रस्त्याची दुरवस्था पाहून खरोखरच समोरच्या व्यक्तीला प्रश्न पडतो.तरीही पदाधिकारी व अधिकारी गप्प का बसले हा पण प्रश्न उपस्थित होतो.तरीही या रस्त्याची लवकरात लवकर दुरस्ती करावी अशी मागणी सावरपाणी येथिल नागरीकांची आहे.अन्यथा या रस्त्यावर काही दिवसातच आमरण उपोषणाला बसण्याची तयारी सावरपाणी गावातील नागरिक करणार आहे.
---परसापुर ते टेब्रुसोंडा रस्ता गेला खड्ड्यात--
त्याच प्रमाणे चिखलदरा तालुक्यातील टेब्रुसोंडा ते परसापुर हा रस्ता पण रस्त्यात खंडा कि खंड्यात रस्ता असा दिसुन येत आहे.तरी राजकीय नेते झोपेत आहात का?असा प्रश्न उपस्थित होतो.कारण या रस्त्यावर राजकीय नेते मंडळींना रोज येजा करावे लागते तरीही नेते मंडळी व पदाधिकारी मुग गिळुन गप्प बसले आहेत का? असा प्रश्न रस्त्यावर येजा करणारे वाहन चालक करीत आहेत.