राखीव जंगलात सागवान वृक्षाची तोड करणाऱ्यांनी केली वनरक्षकांवर दगडफेक.. अखेर पाच वनगुन्हेगार जेरबंद...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील कुवरदेव भाग २ मधील राखीव क्षेत्रामध्ये काहीजण सागवान वृक्षांची तोड करून लाकूड तस्करी करीत असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्याने कुवरदेव भागातील राखीव वनात वनकर्मचारी शोध घेण्यासाठी गेले असता, राखीव जंगलामधून वृक्षतोड करताना कुऱ्हाडीचा आवाज आल्याने वन कर्मचारी त्या आवाजाच्या दिशेने गेले असता वृक्षतोड करणाऱ्यांनी टेकडीवरून वना कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक केली यामध्ये वन कर्मचारी जखमी झाले याच संधीचा फायदा घेऊन घनदाट जंगलातून आरोपींनी पलायन केले. त्या ठिकाणी घटनास्थळावर आरोपीचा एक मोबाईल व कुऱ्हाड मिळून आली. मोबाईल वरून आरोपीची ओळख पाठवल्याने आरोपी विरोधात तसेच अज्ञात आरोपींच्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या राखीव जंगलात अंदाजे ९ ते १० जण अवैध वृक्षतोड करीत होते. दिनांक १६ सप्टेंबर रोजी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी राखीव जंगलात पाहणी केली असता त्यांना २ लाख ५० हजार रुपयांच्या सागवान वृक्षतोड झाल्याचे निर्दशनास आले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी आरोपींचा शोध घेतला असता दिनांक २० सप्टेंबर रोजी यातील आरोपी राजाराम किराड्या, गटुसिंग अलावा दोन्हीही राहणार कुवरदेव यांना अटक करून न्यायालया समक्ष हजर केले असता २५ सप्टेंबर पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. तर दिनांक २२ सप्टेंबर रोजी इतर आरोपींचा शोध घेत असतांना वन गुन्ह्यातील आरोपी मालसिंग अलावा, शोभाराम अलावा, लालसिंग अलावा सर्व राहणार कुवरदेव यांना अटक करण्यात आली असून या सर्व आरोपींनी विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ कलम २६(१),ड,फ,२६(४)व ५२ अन्वये वन गुन्हा कायम करण्यात आला असून आरोपींना न्यायालयासमक्ष हजर केले असता दिनांक २५ सप्टेंबर पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. राखीव जंगलात अवैध सागवान वृक्षतोड करणाऱ्या विरोधात केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध सागवान व्यवसाय करणाऱ्यांचे चांगले धाबे दनानले असून ही कारवाई सरोज गवस उपवनार संरक्षक प्रादेशिक बुलढाणा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी निलेश काळे वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद तसेच सहाय्यक तपास अधिकारी अतुल बडगुजर वनपाल जामोद हे करत असून या गुन्ह्यात या चौकशी करिता वनरक्षक रूपाली राऊत, वनरक्षक प्रज्वल काळुसे, वनरक्षक योगेश गावंडे, वनरक्षक सुरत्ने, वनरक्षक अमोल हिवाळे, वनमजूर पांडू धांडेकर यांनी सहकार्य केले. या कारवाईमुळे मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही..