गौलखेडा बाजार ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जनजागृती..गौलखेडा बाजार ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा..विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी ठराव मंजूर...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी....
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जनजागृतीसाठी गौलखेडा बाजार ग्रामपंचायत कार्यालयात बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच श्री .रामेश्वर चिमोटे यांनी भूषविले.ग्रामसभेचा शुभारंभ खरात साहेब अधिक्षक शिक्षण पंचायत समिती चिखलदरा यांच्या हस्ते संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाला.पंचायत विकास अधिकारी श्री . सुधिर भागवत साहेब यांनी अभियानाविषयी प्रस्ताविक मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या राज्यस्तरीय उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गावकऱ्यांना दाखविण्यात आले.ग्रामसभेत स्वच्छता ही सेवा, स्वस्त नारी सशक्त परिवार, पांदन रस्ते मोहीम, आवास घरकुल योजना, पोषण महाअभियान अशा विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीसंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आले.
खरात साहेब यांनी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या सेवा पंधरवडा काळात सातबारा, घरकुल जागा, क्ष्मसानभूमी व पांदन रस्ते यांसारख्या विषयांवर विशेष लक्ष दिले जाईल, असे सांगून शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन केले. पंचायत ग्राम विकास अधिकरी भागवत साहेब यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा, पंचायत समिती व राज्यस्तरीय पुरस्कार मिळू शकतात असे सांगितले. तसेच लाडक्या बहिणी व घरकुल योजना याबाबत माहिती देत “एकही जण बेघर राहणार नाही” असा निर्धार व्यक्त केला.या ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, पेसा मोबाईलाझर, आॅपरेटर,रोजगार सेवक, तरुण ग्रामस्थ व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.ग्रामसभेनंतर गावातील रस्त्यांच्या दुतर्फा पाम वृक्षलागवड करून अभियानाची सांगता करण्यात आली.