सेवा पंधरवाडा आणि मुख्यमंत्री पंचायत राज च्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय सेवेचा लाभ घ्यावा.... आ.डॉ.संजय कुटे..


 
सेवा पंधरवाडा आणि मुख्यमंत्री पंचायत राज च्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय सेवेचा लाभ घ्यावा.... आ.डॉ.संजय कुटे..

 जळगाव(जामोद) प्रतिनिधी...

नागरिकांचे शासनाविषयीचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. पांदन रस्ता असो, घरकुलाचा प्रश्न असो अथवा आरोग्याचा प्रश्न असो. त्यासाठी आपण सातत्याने शासकीय कार्यालयामध्ये चकरा मारत असतो, परंतु मुख्यमंत्री पंचायत समृद्धी अभियान आणि सेवा पंधरवाडा ह्या कालावधीमध्ये शासनच आता तुमच्या गावांमध्ये तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आलेले आहेत. ह्या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावाला एक समन्वय अधिकारी नेमलेला आहे. नागरिकांनी आपापले सर्व प्रश्न या माध्यमातून सोडवून घ्यावे आणि शासकीय सेवांचा सर्वतोपरी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री आमदार डॉ .संजय कुटे यांनी यावेळी केले. ते दिनांक १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान आणि सेवा पंधरवाड्याच्या शुभारंभा निमित्ताने तालुक्यातील ग्राम सुनगाव येथे श्री आवजीसिद्ध महाराज मंदिर सभागृहात सेवा पंधरवाड्याचे उद्घाटक  म्हणून ते बोलत होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी संजय इंगळे, गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांची सुद्धा ह्यावेळी उपस्थिती होती.सशक्त भारताच्या निर्मितीमध्ये खेड्यापाड्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे,याची जाण त्यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना होती. खेड्याकडे जाण्याचा संदेश त्यांनी त्यावेळीच दिला होता.. अगदी तोच धागा पकडून मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान आणि सेवा पंधरवाडा असा अभिनव कार्यक्रम शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा पासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोबर रोजीच्या जयंती पर्यंत सुरू केला आहे. अगदी "ए पासून झेड" पर्यंत जनतेचे सर्व प्रश्न निकाली काढण्याचे दृष्टीने हे अभियान महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व ग्रामीण जनतेने ह्या सेवा संदर्भात शासकीय अधिकाऱ्यांची समन्वय साधून आपले प्रश्न निकाली काढावे असे आवाहन यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्रीकृष्ण भटकर यांनी केले तर आभार तलाठी वाघ यांनी मांनले,ह्यावेळी  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.उज्वलाताई पाटील, माजी सभापती पंचफुलाताई वंडाळे,गटशिक्षणाधिकारी जोशी, माजी जि.प. सदस्य सुरेश  अंबडकार,माजी जि.प सदस्या रूपालीताई  काळपांडे , गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार,माजी प.स. सदस्य अशोक काळपांडे ,राजकुमार भड,तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत, पत्रकार बंधू, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य यांचे सह सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous Post Next Post