जळगाव जामोद येथे ईद मिलादुन्नबी निमित्त भव्य रॅली...


 
जळगाव जामोद येथे ईद मिलादुन्नबी निमित्त भव्य रॅली...

जळगाव जामोद (प्रतिनिधी) – 

दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी मुस्लिम सर्कल जळगाव जामोद यांच्या वतीने दुर्गा चौकातून ईद मिलादुन्नबी निमित्त भव्य रॅली काढण्यात आली. हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने रॅलीत उत्साहाचे वातावरण होते. ठिकठिकाणी स्वागत कमानी, पुष्पवर्षाव व आकर्षक झांकींनी रॅलीची शोभा वाढवली.या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सैय्यद नफीस यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. लियाकत खान, आझाद पठाण, मुस्ताक जमदार,रिजवान काजी, सैय्यद कमर,अब्दुल साबिर,रहीस खान बुडून खान आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शेख नदीम, तोसीफ बिल्डर, मुशर्रफ शाह, मोबीन खान यांच्या विशेष उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक उत्साह मिळाला.नागरिकांना बिस्किट, केळी, कचोरी व पाण्याचे वाटप करण्यात आले. पोलिस प्रशासनाच्या सजग व्यवस्थेमुळे रॅली शांततेत व शिस्तबद्ध पार पडली. शेवटी सामूहिक दुआ करून बंधुत्व व सौहार्दाचा संदेश देण्यात आला.स्थानिक नागरिकांच्या मते, यंदाची रॅली शिस्तबद्धता, भव्यता आणि सामाजिक संदेशामुळे अविस्मरणीय ठरली.

Previous Post Next Post