जळगाव जामोदच्या केला व छोरीया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रीडा क्षेत्रात विजयाचा डंका...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
केला व छोरीया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव जामोद या शाळेने १९ वर्ष वयोगटातील क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत सर्वत्र कौतुकास पात्र ठरली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला दमदार खेळ सादर करून तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेतेपद, कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक तर जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंगमध्ये सय्यद अब्दुल रहमान सय्यद शकील याने द्वितीय क्रमांक पटकावला.स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी उत्तम शिस्त, संघभावना, जिद्द आणि खेळातील प्राविण्य दाखवत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. क्रिकेट सामन्यात भक्कम फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवण्यात आला, तर कबड्डीत खेळाडूंनी उत्कृष्ट बचाव व आक्रमण करून प्रतिस्पर्ध्यांना नमवले. पॉवर लिफ्टिंगमध्येही विद्यार्थ्यांनी आपली ताकद सिद्ध करून द्वितीय क्रमांक मिळवला.या यशामुळे शाळेत तसेच जळगाव जामोद परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांचे कौतुक करताना शाळेचे अध्यक्ष किशोरजी केला, मुख्य संयोजिका स्वातीताई केला, मुख्याध्यापक विनायकजी उमाळे, प्राचार्य विनोदजी ईश्वरे, क्रीडाशिक्षक योगेश घुटे, आकाश निलजे सांगितले की, "हे यश विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचे, क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या पाठिंब्याचे फलित आहे. भविष्यात हे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावरही शाळेचे नाव उज्ज्वल करतील."या सर्व विजयी खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तयारी त्यांच्या कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा क्षेत्राबद्दल उत्साह निर्माण झाला आहे.