गणेश विसर्जन, ईद-ए-मिलाद मिरवणुका शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस दलाचा जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी केला सत्कार...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या वतीने सांस्कृतिक भवन येथे दिनांक २९ सप्टेंबर रोजी दुर्गा उत्सव व धम्म परिवर्तन दिनानिमित्त शांतता कमिटीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. शांतता कमिटीच्या सभेला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद महाजन, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, ठाणेदार श्रीकांत निचळ, तसेच सोनाळा व तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार उपस्थित होते. जळगाव जामोद सारख्या अति संवेदनशील गावामध्ये गणेश विसर्जन तसेच ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत व उत्साह पूर्ण वातावरणात पोलीस दलासह तालुका दंडाधिकारी यांच्या नियोजनबद्ध तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तडीपारच्या नोटीस देऊन त्यांना या विसर्जन मिरवणुकीपासून तसेच ईद-ए-मिलाच्या मिरवणुकांपासून दूर ठेवले त्याचमुळे जळगाव जामोद शहरात शांततेत व उत्साह पूर्ण वातावरणात दोन्हीही मिरवणुका पार पडल्या त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांचा हिंदू व मुस्लिम समाजातर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलढाणा जिल्हाप्रमुख गजानन वाघ,शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे,हुसेन डायमंड,शहर उपप्रमुख चांद कुरेशी,राजिक कुरेशी, मतीन खान यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत सत्कार केला.