शेतकऱ्यांना गांजा पेरण्याची किंवा किडनी विकण्याच्या परवानगी साठी शेतकरी धडकले उपविभागीय अधिकारी कार्यालयात...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
सतत तोट्यात असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीत गांजा लागवड व किडनी विक्री करण्याची रिसर्च परवानगी मागण्यासाठी आज खेर्डा खुर्द व खेर्डा बु येथील शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना दिनांक ३० सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिले.
जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी शासन व प्रशासन यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे त्रस्त झालेला आहे यंत्रणेच्या हलगडची पुण्यामुळे सतत तोट्यात जाणाऱ्या शेतीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आता स्वतःची किडनी विकण्या शिवाय किंवा शेतीत गांजा पीक लागवड करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही कारण खरी बंगाल 2024 चा पिक विमा मंजूर होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होत नाही, शासनाने जाहीर केलेल्या सोयाबीन व कापसाचे अजून आणायची हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अनुदान अजूनही बरेचसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर दुसरीकडे यावर्षी मागील दोन महिन्यापासून सततचा पाऊस सुरू असून त्यामुळे कपाशीच्या बोंड्या सडून गळत आहे व सोयाबीनच्या शेतात पावसाचे पाणी थांबल्यामुळे व सतत चालू असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा पोकळ राहिलेल्या आहेत व काही ठिकाणी शेतामध्ये पीक खराब झालेले आहेत मे 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मका जवारी भुईमूग कांदा व इतर पिकांची अतोनात नुकसान झाले असून सुद्धा क्रीडा बुद्रुक व खेर्डा खुर्द या गावातील पंचनामे होऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल निरंक सादर केल्यामुळे मिळणाऱ्या लाभापासून शेतकरी वंचित राहिलेले आहेत तसेच मागील वर्षी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी ही केवायसी करून सुद्धा अध्यापय पर्यंत अण्णा मोबदला भेटला नाही या सर्व समस्यांना त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयावर मोर्चा आम्हाला किडनी विक्रीची परवानगी दिया आणि शेतामध्ये गांजा पेरण्याची परवानगी द्या व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा अशा घोषणा देत राज्याचे मुख्यमंत्री त्यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन दिले ह्या वेळेस शेतकरी अविनाश उमरकर, प्रवीण भोपळे, वासुदेव राजनकर, समाधान गिरे,महादेव वानखडे, तुळशीराम,खिरोडकार,श्रीरंग खिरोडकर,प्रमोद तायडे, देविदास तायडे, आनंदा तायडे, सुनाजी नेमाडे, सुधाकर नेमाडे, भाऊराव नेमाडे, अंकुश तायडे, दिलीप भोपळे,मनोहर म्हसाळ, कमला म्हसाळ यांच्या सह शेकडो शेतकरी उपस्थित होते..