त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा व्हाइस ऑफ मीडियाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत केला सदर घटनेचा तीव्र निषेध...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे दिनांक २० सप्टेंबर रोजी वार्तांकनासाठी गेलेल्या योगेश खरे,अभिजीत सोनवणे,किरण ताजने या पत्रकारांवर त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्रा जवळील पार्किंग वर कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हल्ला केला.यामध्ये चारही पत्रकारांना मारहाण केली यामध्ये किरण ताजने हे गंभीर जखमी असून त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.पत्रकारांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा जळगाव जामोद व्हाइस आँफ मिडीयाचे वतीने दिनांक २४ सप्टेंबर रोजी पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा सरचिटणीस जयदेव वानखडे यांनी पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले लोकशाहीला व लोकशाही च्या चौथ्या स्तंभावर घाला घालणारी गंभीर बाब असून पत्रकार समाजातील सत्य घटनांचा आवाज असुन अन्याय , भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतात अशा व्यक्तींवर होणारे हल्ले अत्यंत निंदनीय आहेत त्यामुळे सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई ची मागणी केली आहे.तसेच राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस व प्रभावी धोरण असावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदन देतेवेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा सरचिटणीस जयदेव वानखडे, तालुका उपाध्यक्ष विनोद वानखडे,प्रितम ठाकुर,राजेश बाठे,संजय दांडगे, मंगेश राजनकार, गजानन सोनटक्के, अनिल भगत उपस्थित होते.