त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा..
जळगाव जामोद प्रतिनिधी....
समता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव जामोद द्वारा संचालित त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव बाजार येथे दि.२४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी स्थापना दिवसानिमित्त महाविद्यालयाचे प्रांगणात वृक्षारोपण करून आनंदोत्सव साजरा केला.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसानिमित्त कार्यक्रमाधिकारी प्रा.शरद गावंडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या काटले मॅडम होत्या. यावेळी प्रा.रवींद्र निमकर्डे यांनीही राष्ट्रीय सेवा योजना ही सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्याचा जणू एक कारखानाच आहे. असे मत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी शिस्त स्वयंप्रेरणा स्वयंअध्ययन,कष्ट,प्रमाणितपणा आपल्या जीवनामध्ये अंगीकारावा त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो असे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.कार्यक्रमाला प्रा.योगेश वारुकार, प्रा.माहेश्वरी वाघमारे, प्रा.सुप्रिया इंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाला कु.पलक तायडे,कु अश्विनी गावंडे कु.संजना तायडे,कु.साक्षी जाधव कु.प्रज्ञा बोदळे यांच्यासह त्रिमूर्ती कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते..