कु. आस्था भटकर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातून दुसरी...


 
कु. आस्था भटकर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातून दुसरी...

तेल्हारा तालुका प्रतिनिधी....

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जनता विद्यालय दानापूर ची विद्यार्थिनी कु. आस्था धनंजय भटकर वर्ग १०.हिने वर्ग ८ ते १० या गटात आपल्या वक्तृत्व कलेची चमक दाखवून सिल्वर पदकासह द्वितीय क्रमांक पटकावला.जि. प. अकोला व महाराष्ट्र इंग्लिश टीचर्स असोसिएशन (मेटा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या इंग्रजी भाषेतील तालुकास्तरीय "वक्तृत्व स्पर्धा 2025" डॉ. गोपालराव खेळकर महाविद्यालय तेल्हारा येथे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील सर्वच शाळांनी, व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. "हास्य - जीवनातील महत्त्व" humour - important of life" या विषयावर आपले विचार मांडून वक्तृत्व सादर केले. कु. आस्था धनंजय भटकर हिने सिल्वर पदकासह द्वितीय क्रमांक पटकावला.ती आपल्या यशाचे श्रेय आई, वडील,मुख्याध्यापक, विषय शिक्षक, शिक्षक या सर्वांना देते. तिचे समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Previous Post Next Post