जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवाड्याची उत्साहात सुरुवात...स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेत गावकऱ्यांच्या समस्यांचे केले निराकरण...


  
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवाड्याची उत्साहात सुरुवात...स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेत गावकऱ्यांच्या समस्यांचे केले निराकरण...

सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि.१७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि.०२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान आयोजित सेवा पंधरवाड्याची दत्तपूर (ता.जि. बुलढाणा) येथे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्वतः ग्रामसभा घेत दत्तपूर गावकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले. दत्तपूर हे जिल्हाधिकारी महोदयांचे दत्तक गाव असून गावच्या विकासामध्ये त्यांनी व्यक्तिशः लक्ष घातले आहे. आज सेवा पंधरवाड्याच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीत शिव/ पाणंद रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले व त्याबाबत गावकऱ्यांना अवगत करण्यात आले. तसेच जिवंत ७/१२ मोहिमेबाबतही गावकऱ्यांना माहिती देण्यात आली व घरकुलाच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. त्याचबरोबर दत्तपूर ग्रामपंचायतीच्या वतीने दत्तपूर जिल्हा परिषद शाळेला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी गावकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांनीही गावकऱ्यांना संबोधित केले व विविध शासकीय योजनांची माहिती दिली.यावेळी दत्तपूर गावचे सरपंच संदीप कांबळे,उपसरपंच जीवन दाभाडे, सदस्य आकाश माळोदे,राहीबाई,रमेश जाधव,अनिता गजानन भराड,शीतल समाधान माळोदे, तसेच भागवत वानेरे,ग्रामविकास अधिकारी नितीन इंगळे,तलाठी उषा इंगळे मॅडम,मंडळ अधिकारी पायघन साहेब,कृषि सहाय्यक जाधव साहेब,पोलीस पाटील श्रीकृष्ण राऊत व भास्कर माळोदे,पोलिस जमादार तायडे साहेब,मुख्यध्यापक बबन गोरे, समुदाय आरोग्य अधिकारी अंजली चित्ते,आरोग्यसेवक सचिन चिंचोले, सुनीता वैद्य, गजानन जाधव यांच्यासह गावकरी उपस्थितीत होते.

Previous Post Next Post