नगरपरिषद अभियंता रवी पारस्कर व माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती माणिक वाघ यांच्या झालेल्या वादामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन...


नगरपरिषद अभियंता रवी पारस्कर व माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती माणिक वाघ यांच्या झालेल्या वादामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

अतिक्रमण बाबत तक्रारी आल्यानंतर जळगाव नगरपालिकेने त्या तक्रारी निवारण करण्याकरिता दिनांक १२ सप्टेंबर रोजी माळी खेल परिसरात नगरपरिषद अभियंता रवी पारस्कर आणि त्यांचे सहकारी अतिक्रमणासंबंधीत इंगळे यांनी तक्रार केल्याने स्थळ पाहणी करिता गेले असता तिथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती माणिक वाघ आणि नगर अभियंता रवी पारस्कर यांच्यात वाद विवाद होऊन वाघ यांचे विरुद्ध शासकीय कामात अडथळा असा गुन्हा दाखल झाला.... असे प्रकार शहरांमध्ये वारंवार होऊ नये यासाठी ह्या घटनेचा निषेध करत नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी चार वाजेपर्यंत काम बंद आंदोलन पुकारले..... मुख्याधिकारी डॉ.सुरज जाधव आणि सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर बैठक मारली.... त्यानंतर चार वाजता हे आंदोलन समाप्त केले...अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हे निषेध आंदोलन असल्याचे नगर अभियंता रवी पारस्कर यांनी  सांगितले....या काम बंद आंदोलनामध्ये नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच सफाई कामगार यांनी काम बंद ठेवत पाठिंबा दिला.

Previous Post Next Post