सातपुडा परिसरात जोरदार पाऊस, नदीकाठी गावांना तहसीलदार पवन पाटील यांचा सतर्कतेचा इशारा...


 
सातपुडा परिसरात जोरदार पाऊस, नदीकाठी गावांना तहसीलदार पवन पाटील यांचा सतर्कतेचा इशारा...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू असून पहाडातून वाहणाऱ्या नद्यांना मोठा पूर आला आहे, जळगाव जामोद तालुक्यातील लघु प्रकल्प असलेले गोराडा धरण व राजुरा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने धरणाला मिळणाऱ्या नद्यांना मोठा पूर आला असून हे लघु प्रकल्प जवळपास ७० टक्के भरले असून पाऊस असा सुरू राहण्यास संध्याकाळपर्यंत शंभरी गाठून अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे  वाहून जाणार आहे आहे. त्यामुळे जळगाव जामोद शहरातील पद्मावती नदीकाठी असलेल्या नागरिकांना तसेच राजुरा धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा तहसीलदार पवन पाटील यांनी दिला आहे. नदीकाठी वास्तव्य करणारे नागरिक व गुरांचे गोठे त्यामधील जनावरे यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन देखील तहसीलदार पवन पाटील यांनी केली आहे.२२ जुलै २०२३ मध्ये जळगाव जामोद तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन मोठी आर्थिक व जीवित हानी झाली होती.त्यावेळच्या प्रचंड पावसामुळे कित्येकांची घरे वाहून गेली होती. तसेच नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते त्यामुळे सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Previous Post Next Post