पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आणि निबंध वव्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन....


 
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त  व्याख्यान आणि निबंध वव्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन....

जळगाव जामोद प्रतिनिधी....

दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात एकात्मिक मानवता वाद आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अर्थशास्त्रातील योगदान याविषयी व्याख्यान, निबंध स्पर्धा आणि वकृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती संत गाडगेबाबा आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमा पूजनांने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय मिलिंद जोशी यांनी करून दिला त्याच बरोबर त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला  तसेच अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे कार्यकारिणी घोषित करून अभ्यास मंडळाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.त्यानंतर वैभव घुले आणि कुमारी प्राजक्ता तलवारे या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे आचार्य योगदान विशद केले या याविषयीच्या निबंध स्पर्धेत पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.त्यानंतर सचिन जोशी यांनी पंडित दीनदला उपाध्याय यांचे अर्थशास्त्रातील योगदान याविषयी मार्गदर्शन करत असताना शेती उद्योग गुंतवणूक अर्थव्यवस्था श्रम सिद्धांत उद्योगाच्या विकेंद्रीकरणाचे महत्त्व विशद केले तसेच पंडित यांचे अर्थशास्त्र विचार सध्याच्या परिस्थितीमध्ये कसे तंतोतंत लागू होतात याविषयी सखोल मार्गदर्शन केले.यानंतर अभिजीत कुलकर्णी यांनी एकात्म मानव दर्शन याविषयी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणाच्या सहाय्याने समजून सांगितला.अध्यक्ष भाषणात प्राचार्य गिरीश मायी यांनी शासनाच्या विविध योजना आणि शासनाच्या विविध योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे विचार यांची सांगड घातली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ज्ञानेश्वरी बावस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विठ्ठल देठे यांनी केले या  कार्यक्रमास  या कार्यक्रमास प्रा. विनोद बावस्कर प्रा. ऋषिकेश विभागास प्रा. गणेश जोशी प्राध्यापक विठ्ठल देठे प्रा. सचिन नाटकर प्रा.विनय उंमरकर प्रा. आकाश निलजे अर्थशास्त्राच्या 96 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सहभाग घेतला.

Previous Post Next Post