उमापुर येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचे अनावरण...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर येथे आज दिनांक २५ सप्टेंबर रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखेचे अनावरण उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित राहून शिवसेना पक्षावरील आपली निष्ठा दर्शवली.या प्रसंगी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर भूमिका मांडली. शेतकरी पीकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच इतर विविध मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २९ सप्टेंबर २०२५ रोजी सोमवारी जळगाव जामोद येथे काढण्यात येणाऱ्या भव्य आक्रोश मोर्चात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले.तात्काळ कर्जमाफी आणि पीकविम्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. शासनाच्या अपुऱ्या धोरणामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून, या अन्यायाविरुद्ध शिवसेना सातत्याने लढा देत राहील, असे ठाम मत यावेळी तालुकाप्रमुख संतोष दांडगे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख गजानन वाघ, जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता पाटील, जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे, विधानसभा संघटक भिमराव पाटील, शहर प्रमुख रमेश ताडे, उपशहरप्रमुख संतोष डब्बे, तालुका प्रसिद्धी प्रमुख सुधीर पारवे, माजी युवासेना तालुका प्रमुख विशाल ताकोते, तसेच प्रमोद रोजतकार, राजू गावडे, संजय निंबाळकर तसेच नुकतेच नियुक्त झालेले उमापूर शाखाप्रमुख अर्जुन,उपशाखाप्रमुख पानेकर, प्रकाश बीबाकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.