अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे उपविभागीय अधिकाऱ्यांन मार्फत गृहमंत्र्यांना निवेदन..


पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे उपविभागीय अधिकाऱ्यांन मार्फत गृहमंत्र्यांना निवेदन..

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या चार पत्रकारांना ए.एस. मल्टी सर्व्हिसेसच्या मालक आणि कर्मचाऱ्यांकडून टोल पॉईंटवर पत्रकारांशी हुज्जतबाजी करून त्यांना अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आली आहे. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या या गुंट प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी. अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने 23 सप्टेंबर रोजी येथील एसडीओंच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला मान्यता आहे. पत्रकार समाजाचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवतात, त्यांच्यावरील हल्ले हे थेट लोकशाहीवरील हल्ले आहेत. नाशिक मधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तीन ते चार पत्रकारांना प्रवेश टोल पॉईंटवर अमानुष मारहाण करण्यात आली. पत्रकारांना मारहाणीचे व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर सुद्धा अनेकांनी पाहिले आहेत.सदर प्रकरणात नाशिक पोलिसांकडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु टोल वसुली करणाऱ्या ए. एस. मल्टी सर्विसेसच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. सदर कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून सदर कंपनीला राज्यभरात कुठेही कुठलाही ठेका दिला जाऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.  पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोरपणे आणि गंभीरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर सुरज यादव, राजू घाटे, अविनाश घोडके, रुपेश कलंत्री, गणेश भेरडे, शेख सलीम शेख फरीद, सुरज बोराखडे, मनोज जाधव, सिद्धार्थ निर्मळ, नामदेव टाले आदीसह खामगाव शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या स्वासऱ्या आहेत.

Previous Post Next Post