बापुमिया सिराजोद्दीन पटेल क. वा. व वि. महाविद्यालयामध्ये गणित व भौतिकशास्त्र अभ्यास मंडळांची स्थापना...


 
बापुमिया सिराजोद्दीन पटेल क. वा. व वि. महाविद्यालयामध्ये गणित व भौतिकशास्त्र अभ्यास मंडळांची स्थापना...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

पिंपळगाव काळे येथील बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये दिनांक २३ सप्टेंबर रोजी सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संथेचे अध्यक्ष अँड. सलीम पटेल व सहसचिव रब्बानी देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये गणित व भौतिकशास्त्र विभागाद्वारे अभ्यास मंडळांची स्थापना करण्यात आली व अतिथींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. एफ. टी. शेख होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे गणित विभागाचे डॉ. एम. डी. नेतनस्कर व भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. सी. बी. पलन यांनी केले तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. एफ. टी. शेख यांनी विद्यार्थ्यांना जीवनात अशक्य असे काही नसून आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी सतत  प्रयत्न करत राहण्याचे आवाहन केले. आपली संस्था व महाविद्यालय हे  विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या हितासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे  हे सांगितले व महाविद्यालयाच्या  प्रगतीचे वर्णन केले.गणित अभ्यास मंडळाचे अध्यक्ष पदी रुचा भेलके, उपाध्यक्ष पदी श्रुती अवचार , सचिवपदी समीर शेख, सहसचिवपदी प्रफुल्ल शेळके, तर सदस्यपदी वैष्णवी केदार,पियुष काळपांडे, ख़ुशी इंगळे,सय्यद फझल,प्रगती गायकवाड, पायल तायडे व परवेझ शाह. तसेच भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष पदी कोमल गरुड, उपाध्यक्ष पदी चैताली निकम, सचिवपदी किरण मुन्डोकार,सहसचिवपदी ओम जाधव तर सदस्यपदी स्नेहा मुर्हेकर,प्रफुल म्हसाळ ,पवन तायडे, प्राची खडसान,अर्चना गरुड  यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. प्रश्नमंजुषेचे विजेते बी. एस्सी. तृतीय वर्षाचे विद्यार्थी ठरले.कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. नूर मोहम्मद, प्रा. एन. जी. आसोले, डॉ. एन. के. अग्रवाल, डॉ. ए. एस. जाधव, प्रा. एम. पी. जांभळे, प्रा. शकील खान, डॉ. डी. आर. सिरसाट, प्रा. झोया आफरीन, प्रा गादे, प्रा. तडवी व सर्व शिक्षकांची विशेष उपस्थिती लाभली. स्वागत गीत प्रगती गायकवाड यांनी सादर केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुचा भेलके, तर आभार प्रदर्शन चैताली निकम यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता सर्व विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post