जळगाव जामोद येथे एआयएमआयएम पक्षाची भव्य कोपरा सभा — आगामी निवडणुकांमध्ये एआयएमआयएमचा विजय निश्चित!


 जळगाव जामोद येथे एआयएमआयएम पक्षाची भव्य कोपरा सभा — आगामी निवडणुकांमध्ये एआयएमआयएमचा विजय निश्चित!

जळगाव जामोद प्रतिनिधी—

दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या वतीने जलगाव जामोद शहराध्यक्ष समीर अहमद आर.एन. यांच्या पुढाकाराने एक भव्य कोपरा सार्वजनिक सभा जळगाव जामोद शहरात आयोजित करण्यात आली. या सभेचे अध्यक्षस्थान एआयएमआयएम बुलढाणा जिल्हाध्यक्ष दानिश शेख यांनी भूषविले.सभेला स्थानिक नागरिक, कार्यकर्ते, युवा, महिला व ज्येष्ठ पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. संपूर्ण परिसरात एआयएमआयएमच्या झेंड्यांनी, घोषणाबाजीने आणि जयघोषाने वातावरण भारावून गेले होते.या सभेदरम्यान वक्त्यांनी सांगितले की, एआयएमआयएम पक्ष हा जनतेच्या हक्कांसाठी लढणारा, अन्यायाविरुद्ध उभा राहणारा पक्ष आहे. पक्षाच्या नेत्यांनी हे स्पष्ट केले की, आगामी नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये एआयएमआयएम पक्ष भारी बहुमताने विजय मिळवेल आणि सामान्य नागरिकांच्या विकासासाठी, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात भरीव काम करेल.

जिल्हाध्यक्ष दानिश शेख यांनी आपल्या भाषणात सांगितले की —

“एआयएमआयएम पक्ष सदैव लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवतो. आम्ही जाती-धर्माच्या भेदभावापलीकडे जाऊन, सर्व समाजघटकांना न्याय आणि समानता मिळवून देण्यासाठी कार्यरत आहोत. जलगाव जामोद परिसरात एआयएमआयएमची पकड दिवसेंदिवस वाढत आहे आणि लोकांचा विश्वास आमच्यावर दृढ होत आहे.”शहराध्यक्ष समीर आर.एन. यांनी पुढे सांगितले की, “या वेळेस जनता बदलासाठी तयार आहे. जे वचन फक्त कागदावर दिले गेले, त्याऐवजी आता एआयएमआयएम पक्ष खऱ्या अर्थाने लोकांच्या विकासासाठी काम करणार आहे. आम्ही प्रत्येक वॉर्डात जाऊन लोकांशी संवाद साधत आहोत आणि त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत आहोत.”या सभेत विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच अनेक नव्याने सामील झालेले युवक उपस्थित होते.सभेचा शेवट “जय मजलिस – जय असदुद्दीन ओवैसी साहेब” या घोषणांनी झाला आणि संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Previous Post Next Post