2024-2025 खरीप हंगामातील 121 कोटी 6 लाख रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा... केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा पाठपुराव्याला यश…



2024-2025 खरीप हंगामातील 121 कोटी 6 लाख रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा... केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा पाठपुराव्याला यश… 

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन 2024-2025खरीप हंगामाकरीता बुलढाणा जिल्हयातील शेतकऱ्यांना 121  कोटी 6 लाख रुपये मंजूर झाले असून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ झाली असुन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार  आहे. दिवाळीच्या पुर्वी हि रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश आले असुन ही पिक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

प्रधानमंत्री पीक विमा  जिल्हयातील अनेक शेतकरी या पीक विम्यापासुन वंचीत राहले होते. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिग चव्हान यांच्यासोबत चर्चा केली   पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून  पीक विम्याची रक्कम नुकसानी दाव्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहीजे. असे निर्देश पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ६,२८,८०,५१,५३,९४२.९१ (सहाशे अठ्ठावीस कोटी, ऐंशी लाख, एकावन्न हजार, पाचशे त्रेचाळीस रुपये) इतकी नुकसान भरपाई मंजूर (एकूण ४,७६,३९२ शेतकऱ्यांना मंजुर आहे .या मदतीपैकी, ₹ 4580507605 (तीनशे तीस कोटी, चोपन्न लाख, त्र्याऐंशी हजार, नऊशे पंचवीस रुपये) इतकी रक्कम यापूर्वीच 7,05,028 शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे, उर्वरीत शेतकऱ्यांपैकी 1,21,05,72,359.64 ऑक्टोंबर २०२५ मध्ये वाटप होणारी नुकसान भरपाई (एकशे एकवीस कोटी, पाच लाख, बहात्तर हजार तिनशे एकोनसाठ रुपये मंजुर झाले आहे. यामध्ये जिल्हयातील 63,945 शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

तालुकानिहाय वितरित होणारी पिक विम्याची मदत याप्रमाणे आहे.

चिखली तालुक्यातील 10047०  शेतकऱ्यांना 220711720.89 इतकी सर्वाधिक रक्कम  मंजूर झाली आहे. मेहकर तालुक्यातील 9800 शेतकऱ्यांना 227736660.23 इतकी मोठी रक्कम  मिळणार आहे.सिंदखेड राजा तालुक्यातील 7586 शेतकऱ्यांना 136387223.18 रुपये मंजूर झाले  आहेत. खामगांव: 824 शेतकऱ्यांना 24393801.86 इतकी मदत मिळणार आहे.नांदुरा तालुक्यातील 2032 शेतकऱ्यांसाठी 31247258.68 रुपयांची  रक्कम  मंजुर झाली आहे.लोणार: 5856 शेतकऱ्यांना 71034240.75 इतकी मदत मिळणार आहे.बुलढाणा: 8899 शेतकऱ्यांना 161780945.76 मंजूर झाले आहेत.मोताळा तालुक्यातील 1517 शेतकऱ्यांना 29859006.60 ही रक्कम पिक विम्याची मिळणार आहे.देऊळगाव राजा  3796 शेतकऱ्यांना 47761530.08 मंजूर झाले आहेत.जळगांव जामोद तालुक्यातील 3744 शेतकऱ्यांना  59117536.82 ही रक्कम पिक विम्याची मिळणार आहे.शेगांव तालुक्यातील 3540शेतकऱ्यांना 66685868.71 इतकी मदत मिळणार आहे.संग्रामपूर तालुक्यातील  4468शेतकऱ्यांना 106227940.96 मंजूर झाली आहे.मलकापूर तालुक्यातील 1836शेतकऱ्यांना  27628625.12 ही रक्कम मिळणार आहे.

  नुकसान भरपाईची  रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांची दिवाळी सुध्दा आनंददायी व्हावी यासाठी केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य शासनाकडे जिल्हयातील प्रलंबित दाव्या  संदर्भांतही कृषि मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. व ही प्रकरणे मंजुर करुन घेतली त्यामुळे सन 2024-25 खरीप हंगामातील पिक विम्याची रक्कम राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा संदर्भात तालुकास्तरीय पिक विमा कार्यालयाशी संपर्क साधावा कसे आवाहन  केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्यावतीने करण्यात आले.

Previous Post Next Post