त्रिमूर्ती कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती संयुक्त पणे साजरी..
जळगाव जामोद प्रतिनिधी....
समता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव जामोद द्वारा संचालित त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव बाजार येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या विद्या काटले मॅडम होत्या.
सर्वप्रथम समता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत यु. बी. धुंदाळे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. आनंद धुंदाळे यांनी उपस्थितांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारत मातेचे थोर सुपुत्र लाल यांच्या बहादूर शास्त्री यांच्या कार्याची महती सांगितली. सत्य व अहिंसा याच मार्गाने सत्याचा विजय होतो हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला दाखवून दिल्याचे उदाहरणासह स्पष्ट केले. जय जवान जय किसान हा केवळ विचार नसून भारत देशाला प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचविणारे शिल्पकार आहेत असे प्रतिपादन प्रा. धुंदाळे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रा सुप्रिया इंगळे, प्रा.माहेश्वरी वाघमारे, प्रा. योगेश वारुकार, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा शरद गावंडे यांनी तर आभार प्रा रविंद्र निमकर्डे यांनी केले.