पळशी झाशी येथे आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवडा व पंचायतराज अभियान उत्साहात संपन्न....
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
ग्रामपंचायत पळशी झाशी तर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व सेवा पंधरवडा कार्यक्रम आमदार डॉ. संजयजी कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन व स्वच्छता रॅलीने करण्यात आली. आमदार कुटे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला. श्री शंकरजी महाराज मंगल कार्यालयात महिला बचत गटांच्या वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सेवा पंधरवडा उपक्रमात सहभागी भजन मंडळे आणि विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार आमदार कुटे यांच्या हस्ते करण्यात आला. महिलांच्या स्वयंसहायता गटांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माधुरीताई कैलास मारोडे यांनी भूषवले. प्रमुख उपस्थितीत आमदार डॉ. संजयजी कुटे, पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे, सरपंच प्रियांका मेटांगे, टाले साहेब, गोंडे साहेब व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल मेटांगे, सूत्रसंचालन तलाठी रंगदळ साहेब, तर आभार प्रदर्शन सचिव हेमंत देशमुख यांनी केले.आमदार कुटे म्हणाले, “गावामध्ये एकी असल्यास विकास अटळ असतो. पळशी झाशी गाव एकत्र राहून प्रगती करत आहे, ही आनंदाची बाब आहे.”