“संघ कार्य हे देव, देश आणि धर्म यांचे जतन करण्यासाठी आहे”—प्रशांत दाणी..विजयादशमी उत्सव जनता विद्यालय, जामोद येथे उत्साहात संपन्न...


 “संघ कार्य हे देव, देश आणि धर्म यांचे जतन करण्यासाठी आहे”—प्रशांत दाणी..विजयादशमी उत्सव जनता विद्यालय, जामोद येथे उत्साहात संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जामोद मंडल चा विजयादशमी तथा शस्त्रपूजन उत्सव जनता विद्यालय, जामोद येथे दिनांक ५ आक्टोंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रशांत दाणी (प्रांत शारीरिक प्रमुख, विदर्भ प्रांत) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

आपल्या प्रभावी बौद्धिकात त्यांनी सांगितले की —

“देव निर्मित हा देश संतांची भूमी आहे. या भूमीत जन्म घेणे हे आपले भाग्य आहे. रामसेतू हा काल्पनिक नसून देवनिर्मित आहे आता हे शास्त्रीय दृष्ट्या जगाने मान्य केले. . संघाची निर्मिती धर्म, संस्कृती आणि समाज यांच्या संरक्षणासाठी झाली असून, हिंदू राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असावे.”

ते पुढे म्हणाले —

“हजारो वर्षे पराक्रमी राजे लढले, पण अनेकदा आपल्या लोकांनीच धोका दिला. परकीय आक्रमणकर्त्यांना आपल्याला हरवण्याची ताकद नव्हती. कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यासाठी व्रत, साधना आणि चिकाटी आवश्यक असते; तेव्हाच संकल्प पूर्ण होतो. कुटुंब प्रबोधन, नागरीक शिष्टाचार, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण व स्वबोध या पंच परिवर्तनाच्या पाच सूत्राचा अवलंब करण्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सीताराम दलाल (प्रगतिशील शेतकरी, जामोद) होते.त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशभक्तीपर संघटन असून, यातून स्वयंसेवकांना संस्कृतीचे जतन आणि समाजसेवेचे संस्कार मिळतात.व्यासपीठावर ता.सहकार्यवाह कपिल विभाणी यांची उपस्थिती होती.उत्सवाचे आयोजन विद्यालयाच्या प्रांगणात भव्य पद्धतीने करण्यात आले होते.कार्यक्रमापूर्वी जामोद शहरात भव्य पथसंचलन काढण्यात आले. संपूर्ण जामोदवासीयांनी पथसंचलनाचे स्वागत करत आपल्या घरांसमोर रांगोळ्या काढून व पुष्पवृष्टी करून उत्साह व्यक्त केला.

Previous Post Next Post