संत नगरीत भाविकांची मांदियाळी!-सेवेसाठी संस्थानचे सुसज्ज नियोजन!


 संत नगरीत शेगावात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी!-सेवेसाठी संस्थानचे सुसज्ज नियोजन!

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

दिवाळीच्या सुट्यामुळे संतनगरी शेगाव मध्ये भाविक भक्तांची मोठी गर्दी  पहायला मिळत आहे. दिवाळीनंतर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे संतनगरी शेगाव मध्ये राज्य भरातील विविध ठिकाणचे भाविक श्रींच्या दर्शना साठी येत आहेत.भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरात व शहरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपेपर्यंत २ नोव्हेंबर पर्यंत लाखो भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर संतनगरी शेगाव येथे मांदियाळी राहणार आहे. भक्तांच्या गर्दीने शहरातील मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेले आहेत. श्रींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भविक  भक्तांना  किमान दोन ते तीन तास लागताहेत. भाविक  दर्शनबारीमध्ये राहून श्रींच्या समाधीचे' गण गण गणात बोते' मंत्राचा नाम जप करत मनोभावे दर्शन घेत आहेत. श्रीमुख दर्शनासाठी ३० मिनिटे वेळ लागत आहे. शाळा, कॉलेज यांना दिवाळी सुट्टी असल्याने या दिवसात तब्बल  लाखाच्या वर भाविक श्रींचे दर्शन घेणार असल्याचा अंदाज  आहे.  श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने भाविकांच्या दर्शनाची आणि महाप्रसाद तसेच निवासाची चोख व्यवस्था केली आहे. त्याच बरोबर भक्तांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जात आहे. दररोज हजारो भाविक रेल्वे बस तसेच खाजगी वाहनांनी संतनगरी शेगावात दाखल होत असून. श्रीचे मंदिरात जाऊन समाधीचे मनोभावे दर्शन  घेत आहेत. त्यानंतर मंदिराचे आनंद सागर अध्यात्मिक केंद्र यासह शहरातील इतर धार्मिक स्थळी तसेच जवळच असलेल्या नागझरी येथील श्री.गोमाजी महाराज संस्थान मध्ये सुध्दा भाविक दर्शनासाठी जातांना दिसून येत आहेत.

Previous Post Next Post