महासिध्द अर्बन जामोद शाखेचा दूसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा...


 महासिध्द अर्बन  जामोद शाखेचा दूसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

दि.24 ऑक्टोबर 2025 रोजी महासिध्द अर्बन बँक जामोद शाखेचा दूसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी मंचावर महासिध्द अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णराव इंगळे, महासिध्द अर्बन बँकेच्या अध्यक्षा डॉ.स्वातीताई संदिप वाकेकर, जेष्ठ संचालक भाऊसाहेब इंगळे, जामोद बँकेचे अध्यक्ष विजय हिस्सल, संचालक नारायण दामधर, बसीर खा, हुसेन डायमंड,अरुण पारवे, डॉ परवेज शेख, मोहन उमाळे, भूषण राठी  उपस्थित होतेसदर कार्यक्रम वेळी मान्यवरांच्या हस्ते महासिध्द महाराज व आवजीसिध्द महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन सुरुवात करण्यात आली. या  कार्यक्रम वेळी जामोद येथील एम.बी. बी. एस मध्यें निवड झालेल्या कु.ऋतुजा पदमाकर दामोदर व संकेत लक्ष्मण दामधर यांचा  सत्कार करण्यात आला व वाहन धारक कर्जदार गणेश भास्कर दातिर, दत्ता सपकाळ, ऋषिकेश दलाल यांचा सुद्धा यावेळी वाहन तारण कर्ज वाटप करून चावीचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला जामोद येथील प्रतिष्ठित नागरिक समाधान दामधर,वसंता धूर्डे,उखर्डा सोळंके, एमडी साबीर,बब्बू भाई, रोशन सपकाळ , कार्तिक राऊत  अनेक मान्यवर उपस्थित होतेसदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर व्यवस्थापक अनिल इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखा अध्यक्ष विजय हिस्सल यांनी केले..सदर कार्यक्रमाला जामोद भागातील नागरिकांना व बँकेचे संचालक, सभासद,ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Previous Post Next Post