मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट..
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे) मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील माझ्या बुलढाणा येथील शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेटीस आले. त्यांच्या या भेटीमुळे परिसरात उत्साही आणि ऊर्जावान वातावरण निर्माण झाले.या वेळी माजी नगराध्यक्षा सौ. पूजाताई संजय गायकवाड, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, धर्मवीर युथ फाऊंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, शिवसेना मोताळा तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, सरपंच प्रवीण जाधव तसेच नितीन सुपे, प्रा. अनिल रिंढे, रविराज राठोड, गोविंदा खुमकर, मारुती कोल्हे, गणेश राजस, अजय बिल्लारी, बंडू आसबे, विष्णुमामा मुळे, विजय राऊत, उदय सुरडकर, श्रीकृष्णा शिंदे, ज्ञानेश्वर खांडवे, रोहित गवळी यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या सदिच्छा भेटीदरम्यान विविध स्थानिक विकास विषयांवर आम्ही चर्चा केली. बुलढाणा मतदारसंघातील प्रलंबित कामकाज आणि भावी विकास योजनांबद्दल सविस्तर माहिती देत रचनात्मक संवाद साधला.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या सहकार्यपूर्ण प्रतिसादामुळे आणि उत्साही वातावरणामुळे ही सदिच्छा भेट विशेष ठरली.