मागासवर्गीय कल्याण निधी वापरून मागासवर्गीयांच्या सक्षमीकरणासाठी सतत सर्व ग्रामपंचायतीने प्रयत्नशील रहावे-आ.कुटे..
जळगाव जामोद प्रतिनिधी....
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जळगाव जामोद येथील पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये वित्त आयोगाच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी मधील समाज कल्याण अंतर्गत १५% राखीव निधी मधून मागासवर्गीय कल्याणासाठी समाज मंदिरा करिता तसेच अभ्यासिके करिता साहित्य वाटपाचा राज्यातून एकमेव असा उपक्रम राबविण्यात आला. दिनांक १० ऑक्टोबर रोजी जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ३८ ग्रामपंचायतींना १५% मागासवर्गीय विशेष निधीमधून समाज मंदिर तसेच अभ्यासिकेसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चावरा सरपंच शोभा इंगळे, उद्घाटक व शुभ हस्ते मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे सह प्रमुख उपस्थितीत वंचीत बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रमेश नाईक,अरुण पारवे,रतन नाईक, देवा दामोधर,सुनील बोदडे, स्वप्नील गवई,रवी जाधव याची उपस्थिती होती.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत सामाजिक न्यायाच्या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतीने विशेष उपक्रम राबवून गावातील प्रत्येक घटक सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले.पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत असलेल्या एकूण ३८ ग्रामपंचायतींनी आज पंचायत समिती कार्यालयामध्ये ग्रामपंचायतच्या ग्रामनिधी मधून मागासवर्गीय कल्याणासाठी १५ टक्के निधी मधून समाज मंदिरासाठी कपाट, टेबल आणि खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या.ग्रामपंचायतीकडून समाज कल्याण विभागाचा १५ टक्के राखीव निधी हा मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी खर्च करणे अपेक्षित आहे परंतु बराच अनुशेष बाकी असल्याने ग्रामपंचायतीच्या समाज मंदिरात साहित्य पुरवणे व त्याचा वापर अभ्यासिकेसाठी करणे यासाठी आ.डॉ.संजय कुटे यांचे संकल्पनेतून व त्याचे नियोजन गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचे संमतीने साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता व आज पंचायत समिती जळगाव जामोद चे प्रांगणात आमदार डॉ संजय कुटे यांचे हस्ते तर सर्व सरपंच यांचे उपस्थितीत आयोजन करण्यात आले,वाटप होत असलेल्या साहित्याचे रूपांतर अल्पावधीतच अभ्यासिकेमध्ये करण्याचे आश्वासन माजी मंत्री डॉ संजय कुटे यांनी बोलताना दिले.

यावेळी गटविकास अधिकारी संदीपकुमार मोरे यांनी ग्रामनिधी मधील योजना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान योजना सूर्यघर योजना बाबत सविस्तर माहिती यावेळी देऊन सन २४-२५-२६ मधील घरकुले तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना केले तसेच समाज मंदिरासाठी वाटप होत असलेल्या साहित्याचा सदुपयोग ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी यांनी संबंधितांकडून करून घ्यावा असे आवाहन यावेळी केले.

यावेळी ३८ ग्रामपंचायतीचे साहित्य वाटप करताना ३८ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य त्या गावचे ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले. यावेळी पत्रकार बांधवांसह हजारो नागरिकांची उपस्थिती होती.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष पवन पवार,गोपाल गिरी, अनिल अंबडकार,समाधान जाणे, तुकाराम चौधरी,देवरे,महिला ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण भटकर यांनी केले तर नियोजन सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र इंगळे यांनी केले.