सय्यद शकिल/अकोट...
विदर्भ महसूल सेवक संघटना आणि महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना संघटना यांनी नागपूर संविधान चौक येथे दिनांक 12 सप्टेंबर २०२५ पासून कामबंद आंदोलन करण्यात आले .मात्र महसूल सेवक यांची चतुर्थ श्रेणी मागणी रास्त असूनही अद्याप पर्यंत अपेक्षित असा काहीच पातीसाद महाराष्ट् शासनाकडून देण्यात आलेला नाही.त्यामुळे विदर्भ महसूल सेवक संघटना अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी अन्नत्याग उपोषणाचा इशारा यापूर्वी आंदोलनात मागणी मान्य न झाल्यास १५ दिवस आधी दिला होता त्याप्रमाणे गेले ४ दिवसांपासून विदर्भ महसूल सेवक संघटना अध्यक्ष श्री रवींद्र बोदेले व राज्य उपाध्यक्ष श्री.योगेश शेडमाके हे अन्नत्याग उपोषण साठी बसले आहेत त्यांना प्रकृती आता नाजूक स्थितीनं आहे. मा.महसूल मंत्री दुर्लक्ष करीत आहेत, मा.मुख्यमंत्री दुर्लक्ष करीत आहेत.
परंतु मागणी मान्य न झाल्यास काय होईल उपोषण करता यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास राज्यातील महसूल सेवक काय करतील?त्यांच कुटुंबाचे काय?राज्य सरकार का निर्णय घेत नाही ? आता पुढे आजुन किती तीव्र आंदोलन होईल? कर्मचारी यांच्याच आंदोलन कडे दुर्लक्ष का करते सरकार असे प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात पडत आहेत गेले कित्याक वर्ष कोतवाल महसूल सेवक महसूल मध्ये विविध कामे करीत आहेत महाराष्ट्र राज्याची विविध शासकीय धोरणे उपाय योजना शासन स्तरावरून ते गाव पातळीवरील महत्त्वाच्या योजना तसेच केंद्र शासनाच्या राज्यात सुरू असणाऱ्या महत्त्वाच्या योजना इत्यादींची अंमलबजावणी राज्यातील अंतिम घटक म्हणजेच आपले शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे महसूल सेव करत आहेत आज स्थितील महसूल सेवक यांना खूप काही कमी सांगितले जातात त्यामध्ये निवडणुकीची काम असेल हे पीक पाहणी सहाय्यक म्हणून काम असेल बी एल ओ म्हणून काम असेल तलाठी ऑफीशी साफसफाई करण्यासाठी तलाठी ऑफिस ते तहसीलदार कार्यालय येथे दप्तर ने आण करणे असेल नैसर्गिक आपत्तीच्या नियंत्रण कक्षातील रात्रपाळी असतील नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रत्यक्ष पंचनामा करण्याचे काम असेल वाळू माफिया यांच्या बद्दल माहिती वरिष्ठ पर्यंत पोचवणे ह असेल शासकीय स्तरावर ठरलेल्या असतील त्या सर्वसामान्य शेतकरी यांच्यावर पोहोचवण्याचे काम असेल वसुली करणे माननीय मंत्री महोदय माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय तहसीलदार साहेब किंवा माननीय इतर अधिकारी यांचे दौरे असतील त्यांचा प्रोटोकॉल करणे यासंबंधी काम असेल माननीय पालकमंत्री यांच्या दौरा या संदर्भात काम असेल असे विविध कामे महसूल सेवक आज पर्यंत ब्रिटिश काळापासून करत आलेला आहे शासकीय स्तरावर जेव्हा वर्ग 4 चा कर्मचारी जी कामे करतो तीच कामे कदाचित त्याच्यापेक्षा जास्त कामे हा महसूल सेवक म्हणजे जुने नाव कोतवाल ब्रिटिश काळापासून गरज आहे परंतु त्याच्या मागणीचा म्हणजेच विचार अद्याप पर्यंत कधीही झालेला नाही फक्त मानधन तुटपुंज वाढवून दिले आहे असे शासकीय मंत्रिमंडळ व शासन उपकाराची भाषा करत आहे आणि काही शासन निर्णय हे त्यांच्या विरोधात प्रत्येकी तीन वर्षांनी फक्त दीड हजार रुपये वाढवून दिले जातील असे शासन निर्णय पारित केले जात आहे जेणेकरून महसूल सेवक महसूल सेवक यांनी पुढे कोणत्याही मागण्या घेऊन आपल्यासमोर येऊ नये यासाठी मंत्रिमंडळ यांनी हा एक सोपा उपाय माननीय सचिव यांच्या मार्गदर्शनाने घेतलेला दिसून येतो असे सर्वसामान्य महसूल सेवक यांना वाटत आहे. जेव्हा जेव्हा महसूल सेवक यांचे चतुर्थश्रेणी मागणी शासनासमोर मांडले जाते तेव्हा उगाचच कुठलीतरी कमिटी समिती स्थापन केली जाते आणि त्यांचा अहवाल मंत्रिमंडळ यांना हवा तसा घेतला जातो त्यामध्ये असे सांगितले जाते की महसूल सेवक यांना चतुर्थ श्रेणी दिल्यास .आता बाकीचना त्यांना द्यावी लागेल म्हणून तुम्हाला देऊ शकत नाही हे योग्य आहे का त्यांना पण द्या आम्हाला पण द्या .कामाचे स्वरूप बघा महसूल सेवक रोज 24तास पर्यंत काम करतात.सगळे काम हे महसूल सेवक करत असतात नागपूर येथे आज स्थितीला अन्नत्याग उपोषणाचा चालू आहे गेले तीन ते चार दिवस उपोषण करते यांनी अन्न सोडले आहे त्यांची प्रकृती गंभीर आहे . त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्यांच्या कुटुंबाचे काय ?
संपूर्ण महाराष्ट्रीय राज्यातील जवळ जवळ१२००० महसूल सेवक आणि त्यांची कुटुंबे मिळून ५००००० लोक राज्य महसूल सेवक संघटना,तलाठी संघटना यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांची संख्या अंदाजी १ लाख असेल महसूल सेवक ज्या ज्या गावात काम करतो त्यांची संख्या खूप सारी त्यांचं पण सरकारच्या महसूल सेवक यांच्या संदर्भात निर्णयावर लक्ष वेधून आहे.एकूण विचार करता महसूल सेवक पासून जिल्हाधिकारी यांना सुध्दा सरकार काय निर्णय घेते या कडे लक्ष आहे.सरकारने लवकरात लवकर मागणी मान्य करावी हीच महसूल सेवक यांची न्याय मागणी आहे तथापि मा.महसूल मंत्री, अर्थ मंत्री ,महसूल मंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे तथापि अकोला जिल्ह्यातील महसूल सेवक यांनी ही आपल्या जिल्ह्यातील मा.खासदार मा.आमदार यांनी सत्ताधारी पक्ष यांना सांगून न्याय द्यावा अशी विनंती केली आहे ..तसेच त्यांच्या जीवाची त्यांच्या हक्काची व न्याय मागणीची विचारपूस करून महसूल सेवक यांचे कोणतेही नुकसान न होता पालक म्हणून मा.पालकमंत्री आमचा आवाज महसूल मंत्री व मंत्रिमंडळ पर्यंत तत्काळ पोचवतीला व आम्हा महसूल सेवक यांना न्याय देतील अशी अपेक्षा अकोला जिल्ह्यातील महसूम सेवक यांना आहे माननीय महसूल चंद्रशेखर बावनकुळे व मा.मुख्यमंत्री नागपूरचे आहेत आंदोलन तिथेच चालू आहे संपूर्ण राज्याचे लक्ष या आंदोलनाकडे आहे.