बुलढाणा जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यवाही दरम्यान एक माथेफिरू वकील राकेश किशोर तिवारी याने बूट फेकण्याचा प्रयत्न केला, ही घटना समस्त भारतीय समाजाच्या अंतःकरणाला हादरवून टाकणारी आहे.
ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून, भारतीय न्यायव्यवस्था, संविधान, सामाजिक न्याय व लोकशाही मूल्यांवरचा थेट प्रहार आहे.या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे!!यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रमुख नरेंद्र खेडेकर,आमदार सिद्धार्थ खरात,मा.आ.राहुल बोंद्रे,शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत,शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष प्रसन्नजीत पाटील,नरेश शेळके,ज्योतीताई खेडेकर,युवा सेना नंदू कऱ्हाडे,सुमित सरदार, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर,राष्ट्रवादी जळगांव जामोद विधानसभा अध्यक्ष विश्वासराव पाटिल, तालुकाप्रमुख विजय इतवारे,राष्ट्रवादी जळगाव जामोद तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, शहरप्रमुख नारायण हेलगे, अशोक मामा गव्हाणे,संजय शिंदे व बुलडाणा जिल्ह्यातील माहाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते!!