हिवरखेड नगर परिषद महाराष्ट्रात आदर्श ठरणार..आ.मिटकरी...जनसंपर्क दौऱ्यात नागरिकांशी साधला मनमोकळा संवाद....
हिवरखेड प्रतिनिधी...
ज्याप्रमाणे हिवरखेडला शहराचा दर्जा मिळविण्यासाठी नगरपरिषद निर्मितीचा दिलेला शब्द खरा ठरविला त्याच प्रकारे जनतेने नगरपरिषद निवडणुकीत आशीर्वाद दिल्यास हिवरखेड नगर परिषद महाराष्ट्र राज्यात आदर्श ठरेल असा विकास करून दाखविणार असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी हिवरखेड येथील जनसंपर्क दौऱ्यात केले.हिवरखेड शहरात लोकप्रिय आमदार अमोलदादा मिटकरी यांनी विविध ठिकाणी दिवाळी स्नेहमिलन भेटी गाठी व काही ठिकाणी सांत्वन भेटी केल्या. गावातील गल्ली गल्लीत जाऊन प्रत्येकांच्या हृदयात एक आपुलकीचे स्थान निर्माण केले.गावातील अनेक परिवारांच्या सदस्यांच्या भेटी घेतल्या.यामध्ये भीम नगरातील बुद्ध विहारात जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले.गावातील जेष्ठ नेते मुन्नाभाई मिरसाहेब यांच्या निवासस्थानी जाऊन मिरसाहेब यांची व त्यांच्या कुटुंबांची भेट घेतली.महेंद्र कराळे गुरुजी यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यांच्या आईच्या तब्येतीची चौकशी केली. कसूरकार आजोबा यांच्या निवासस्थानी भेट दिली. आ. मिटकरिंनी पंकज भाऊ अग्रवाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता तेथे अग्रवाल समाज आणि अग्रसेन भवन समितीच्या वतीने त्यांचा हृदय पूर्ण सत्कार करण्यात आला.तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आनंद भाऊ बोहरा यांच्या निवासस्थानी भेट देऊन विकास विषयक मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. सोबतच राठी परिवाराची सुद्धा भेट घेतली. विकास मैदान हिवरखेड येथे हिंदू खाटिक समाज बांधवाच्या वतीने मिटकरी साहेबांचा सत्कार करण्यात आला. येथे सभागृहाची मागणी करण्यात आली. आईकुसुमाई किराणावर चिंतामणराव खिरोडकार, भगवानजी खिरोडकार यांची भेट घेतली.गावातील ज्येष्ठ नेते वसंतराव ओंकारे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या समस्या सोडवण्याबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत चर्चा करण्यात आली, खेळाडूंसाठी क्रीडांगणा साठी चर्चा करण्यात आली. तसेच गावातील विकासाच्या नकाशाबाबत चर्चा करण्यात आली.नंतर गावातील प्रभाग ३ मध्ये शाहरुख लाला यांच्या ऑल इंडिया मुशायरा या ठिकाणी भेट देऊन आपले मनोगत व्यक्त करून अनेकांची मने जिंकली, व या ठिकाणी विकास कामाबाबत १५ लाखाचा निधी मंजूर केल्याची यावेळी घोषणा केली. यावेळी त्यांच्या सोबत अकोटचे मोहम्मद बद्रुजम्मा, सुरेशभाऊ ओंकारे, रामदास नाठे, कु आचलताई सुरेशराव ओंकारे,संतोष भटकर, सुनील कवळकार,अन्सार खा, अजहर खा, स्वप्नील थोरात, खिरोडकार सर, गणेश भड, संदीप खिरोडकार, प्रवीण वानखडे, धनंजय ओंकारे, यश ओंकारे, शिवा धुरदेव, गोलू खीरैया, प्रथमेश कवळकार, रशीद बारदाने वाले, शोएब, मुदशिर, शायर कवी आणि सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज, अर्जुन खिरोडकार हजर होते.तसेच आमदार मिटकरी यांच्या हिवरखेड प्रति असलेल्या प्रेमामुळे अनेक चाहत्यांनी आमदार मिटकरी यांना गराडा घातला.
--विविध ठिकाणी सांत्वन पर भेटी--
पत्रकार जितेश कारीया यांच्या निवासस्थानी त्यांचे बंधू स्व. देवेश कारीया यांना श्रद्धांजली वाहिली,शिक्षक मयुर लहाने सर यांचे वडील स्व बंडूजी लहाने यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या निवासस्थानी सात्वन केले.सोबतच मंडवाले कुटुंबियांचे सांत्वन केले.मातंगपुऱ्यात जाऊन धुरदेव परिवाराचे सांत्वन केले,गावातील (इंदिरा नगर) स्व भाऊदेवराव गिऱ्हे नगरातील देवानंद इंगळे यांचे बंधू. स्व अजय इंगळे यांना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.
