माजी मुख्याध्यापक स्व.श्रीकृष्ण वाघ गुरूजी यांच्या स्मृतीदिनी वडशिंगी शाळेस ६ पंखे भेट,शिवश्री मनोज वाघ यांचा स्तुत्य उपक्रम...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त दिनांक २ आक्टोंबर रोजी आयोजित कार्यक्रमात वडशिंगी गावचे सुपुत्र शिवश्री मनोज वाघ आणि त्यांच्या मातोश्री श्रीमती चंदाताई वाघ यांनी माजी मुख्याध्यापक स्व.श्रीकृष्ण वाघ गुरूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त वाघ परिवाराचा समाजसेवेचा वारसा चालू ठेवला आहे.
वडशिंगी शाळेत नव्याने बांधलेल्या भोजन कक्षा साठी ६ फॅन सप्रेम भेट दिले.माजी मुख्याध्यापक स्व.श्रीकृष्ण वाघ गुरूजी यांनी त्यावेळी सुरू केलेला समाजसेवेचा वारसा अविरत चालू ठेवत जो कुणी वाघ कुटुंबाकडे मदतीसाठी गेला असेल तो कधीच विना मदत खाली हात आला नाही. मागील वर्षी देखील २ आक्टोंबर रोजी मनोज वाघ यांनी वडशिंगी शाळेला ५ पंखे दिले होते.यापुढेही आपण वडशिंगी शाळेच्या विकासासाठी सदैव सहकार्य करतच राहू असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.माजी मुख्याध्यापक स्व.श्रीकृष्ण वाघ गुरूजी आज जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या परिवाराने चालवलेल्या सामाजिक उपक्रमांनी ते जणू आजही शाळेसाठी कार्यरत असल्याचे सर्वांना वाटत आहे.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वकिल खान,सदस्य अनिल भगत,गायत्री गिरी,मुख्याध्यापक विजय म्हसाळ,गावातील प्रतिष्ठित मधुकर भगत, हरिभाऊ मारोडे, अमोल वाघ,सारंगधर वाघ,उमेश वडनेरकर,शिक्षक सुगदेव भगत,सुनीता येनकर,वर्षा राजगुरे, श्रीकृष्ण भटकर यांचेसह गुलाबराव लोखंडे, पंकज उमरकर उपस्थित होते.वाघ परिवाराच्या या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी श्रीमती चंदाताई वाघ आणि मनोज वाघ यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्ताविक म्हसाळ सर यांनी तर आभार प्रदर्शन भगत सर यांनी केले.