जळगाव जामोद प्रतिनिधी...
संपूर्ण जगात मराठ्यांचा नावलौकिक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापणेनी मराठा शौर्य पुन:स्थापीत झाला तो अलीकडे "ऐक मराठा लाख मराठा" ही घोषणा देत जागला त्या मराठा वंशाचे आपण आहे.याचा गर्व वाटावा अस बोलताना महाराज पुढे म्हणाले इरानी, अफगाणी, मोगल भातावर आक्रमण करतांना ते फक्त मराठ्यांना भित असत! ह्या वेळी चावरा इलोरा येथील समाजातील जेष्ठ रघुनाथ मोरखडे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंचावर उपस्थित होते हा समितीचा अनोखा उपक्रम होता.मराठा पाटील समाज सेवा समिती च्या वतीने काल संत सखाराम महाराज यांच्या पुण्यभूमी मध्ये मराठा पाटील उप वर-वधु परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. जगदगुरु तुकाराम महाराज,जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराय घडले आपण सुध्दा प्रथम आई वडील, संत यांच्या मार्गदर्शनाखाली जर वाटचाल केली तर वैयक्तिक जीवनात यशस्वी होऊ असा मोलाचा सल्ला देत लग्नाच अवडंबर टाळण्यासाठी त्यांनी मत मांडले तर मेळावा आयोजकांनच कौतुक केले. जिवणात कुठे तरी धाक ठेवा हा मंत्र त्यांनी युवकांना दिला...
-----------------------------
मराठा भुषण सन्मान पत्र देऊन समाज सेवकांचा केला गौरव.
जळगाव जामोद-संग्रामपुर परिसरात ९० च्या दशकात अनेक समाज सेवकांनी सामुहिक विवाह सोहळा चळवळ उभी करून यांच पावण भुमित आरंभ केली होती.त्या चळवळीतील आपल्यात आज हयात नसलेल्यांना मरणोपरान्त मराठा समाज भुषण सन्मान पत्र त्यांच्या परिवारातील सदस्यांना ह भ पण तुकाराम महाराज आणखी समाजातील मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले ते .१)स्व. तुळशीराम फकीरचंद खुपासे गुरुजी २)स्व.अवचीतराव विष्णाजी ढोले साहेब ३)स्व .वासुदेवराव मानखैर ४)स्व.मृगुटराव वामनराव खंडेराव ५)स्व. डाॅ अविनाश समाधान पाटील ६)स्व.समाधान उर्फ नानासाहेब शित्रे पाटील ७)स्व.डाॅ दिगंबर पांडुरंग गांवडे .आणी आजही समाजसेवेत असनारे रामरतनजी गोतमारे रा. धामणगाव गुलाबराव मारोडे रा.झाशी पळशी , यांना मराठा समाज भूषण म्हणून सन्मानीत करण्यात आले.सन्मान पत्राचे वाचण भिमराव पाटील यांनी केले तेव्हा वातावरण भावना विभोर झाले होते.छत्रपती शिवराय, संत श्री. सखाराम महाराज यांच्या प्रतिमा पुजणानी कार्यक्रम आरंभ होऊन संत प्रवचन उप वर-वधु परिचय वाचण झाल्यावर पसायदानानी मेळावा ची सांगता झाली. या प्रसंगी ३०००च्या जवळपास समाजबांधव, महिला भगिनी व,युवक, युवती समीतीचे कैलास कडाळे ,नानाभाऊ पाटिल, श्रीक्रिष्ण काळे ,प्रमोद पाटील,रवी पाचपोर , संजूभाऊ खोंड ,वैभव दाभाडे, डॉ जयंतराव खेडकर,प्रकाश गावंडे ,वैभव सारोकार , गजानन मानकर , संजयभाऊ ठाकरे, कैलास मारोडे रुस्तम दाभाडे ,श्रीधर गायकवाड, शशीकांत भेंडे सुनील मोरखडे गजानन मोरखडे संदीप मोरखडे अरविंद तिजारे आणि समीतीचे ईतरही सर्व कार्यकर्तेंनी मेळावा यशस्वी करणेसाठी अथक परिश्रम घेतले.७००हुन अधिक परिचय पत्रक भरल्या गेले ४६४पुस्तक नोंदणी झाली ह्या भव्यदिव्य सोहळ्यात उपवर वधूवर यांनी जवळपास १७५आसपास मुला मुलीनी प्रत्यक्ष परिचय दिला.वधूवर परिचय मेळाव्याला अन्नदान दाते महादेवराव फाळके यांचे सुध्दा समीतीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला समितीने आभार मानले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठा पाटील समाज सेवा समिती बुलढाणा जिल्हा चे अध्यक्ष अॕड. भाऊराव भालेराव यांनी केले तर सुत्रसंचालन शिवाजीराव वाघ- अभयसिह मारोडे या नी केले .आभार प्रदर्शन समितीचे कार्याध्यक्ष कैलास कडाळे यांनी केले
