केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश...सुलतानपुर येथील 100 खाटांच्या योग व निसर्गोपचार रुग्णालयाला राज्यशासनाने दिली 25 एकर शासकिय जमिन... 4 नोव्हेंबर शासन निर्णय निर्गमित...


केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश...सुलतानपुर येथील 100 खाटांच्या योग व निसर्गोपचार रुग्णालयाला राज्यशासनाने दिली 25 एकर शासकिय जमिन... 4 नोव्हेंबर शासन निर्णय निर्गमित...

बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी....

लोणार तालुक्यातील सुलतानपुर येथे योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषदेच्या अत्याधुनिक 100 खाटांच्या रुग्णालयास 25 एकर जमिन देण्याचा निर्णय महसुल व वनविभाग मंत्रालयाने घेतला आहे. त्या संदर्भातील शासन निर्णय 4 नोव्हेंबरला निर्गमित झाला असुन या निसर्गोपचार रुग्णालयाचा मार्ग सुकर झाला आहे. केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

बुलढाणा जिल्हयातील लोणार या जगप्रसिध्द पर्यटन स्थळी योग आणि निसर्गोपचार रुग्णालय उभारल्या गेले पाहिजे या दृष्टीकोनातुन योग आणि निसर्गोपचार संशोधन संस्थेमार्फत केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडे मागणी करण्यात आली होती. दरम्यान हे योग आणि निसर्गोपचार रुग्णालय उभारणीसाठी राज्याच्या महसुल आणि वनविभागाकडे लोणार तालुक्यातील सुलतानपुर येथील गट नं.885 क्षेत्रातील 25 एकर जमिन देण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्यशासनाकडे बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाठविण्यात आला होता. त्यानंतर केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यशासनाच्या महसुल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची भेट घेऊन सदरहु जमिन योग व निसर्गोपचार रुग्णालयाला विनामुल्य देण्यासंदर्भात चर्चा केली होती. जागतीक दर्जाच्या लोणार सरोवर परिसरामध्ये हे रुग्णालय उभारल्या गेल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल हेही त्यांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर या रुग्णालयाला जमिन देण्यासंदर्भातील सकारात्मकता राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांना भेटीदरम्यान दर्शविली होती. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2025 रोजी महसुल व वनविभाग मंत्रालयाच्या वतीने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असुन यामध्ये बुलढाणा जिल्हयातील लोणार तालुक्यातील मौजे सुलतानपुर येथील शासकिय गट नं.885 एकुण क्षेत्रातील 29.62 हेक्टर आर जमिनीपैकी 25 एकर जागा केंद्रिय योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषदेच्या अत्याधुनिक 100 खाटांच्या रुग्णालय स्थापनेस (उभारण्यास) विनामुल्य जागा देण्याससंदर्भातील निर्णय सहाय्यक सचिव ज्ञा.ल.सुळ यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाला आहे. त्यामुळे आता सुलतानपुर येथे उभारण्यात येणाऱ्या योग निसर्गोपचार रुग्णालय उभारणीला गती मिळणार असुन राज्यशासनाने जमिन उपलब्ध करुन दिल्याबद्दल केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहे.

Previous Post Next Post