जिल्हा परिषद हायस्कूल वडशिंगी च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह सोहळा संपन्न...


 जिल्हा परिषद हायस्कूल वडशिंगी च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह सोहळा संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जिल्हा परिषद हायस्कूल वडशिंगी च्या सन २००० ते २००१ च्या वर्ग १० च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह सोहळा दिनांक ४ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद हायस्कूल वडशिंगी च्या शाळेमध्ये मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्याचबरोबर मान्यवरांचे स्वागत आणि त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले वाघ सर तसेच इतर मान्यवर फंड सर,येनकर सर, दाते सर,तिडके सर या सर्वानी मार्गदर्शन केले तसेच जुन्या आठवणीना उजाळा दिला. तसेच माजी विद्यार्थ्यांपैकी डॉ.समाधान मोरखडे, सुनील सपकाळ आणि  प्रा.भागवत राठोड,अनिता राठी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम मध्ये संदीप अंबुसकर ज्ञानेश्वर वाघ, मुरलीधर खोडके,प्रदीप येनकर,गणेश शेळके, योगेश गावंडे,अमोल मानकर,अमोल उमरकर, संतोष पवार, दिगंबर वायझोडे,मंगेश वायझोडे,इस्माईल शेख,प्रमोद कुयटे,विठ्ठल वाघ,विनोद बाजोडे निलेश जाधव,निलेश खिरोडकार,प्रदीप दाते यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमांमध्ये राधा आढाव,अनिता राठी,मनीषा सोनोने,दिपाली फेरण या सर्वांनी सहभाग नोंदविला आणि कार्यक्रम अतिशय आनंद उत्सवामध्ये पार पडला..

Previous Post Next Post