जळगाव जामोद प्रतिनिधी...
बिहार मध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) दणदणीत विजय मिळवला त्याबद्दल आज जळगांव जामोद मध्ये फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज, शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी लागला आहे आणि यात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) दणदणीत विजय मिळवला आहे.NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) ने २४३ पैकी २०० हून अधिक जागा जिंकत मोठी मुसंडी मारली आहे. दुसरीकडे, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला मोठी हार पत्करावी लागली आहे.यामध्ये NDA ने २०० हून अधिक जागांवर आघाडी मिळवीत भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.या ऐतिहासिक विजयानंतर बिहारसह जळगाव जामोद मध्येही NDA समर्थकांनी जल्लोष साजरा करण्यात केला.जल्लोष साजरा करण्यासाठी जळगांव जामोद मधील स्थानिक दुर्गा चौकामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजी ने विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.प्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष कैलास पाटील, तालुक्का अध्यक्ष संजय पांडव, निलेश शर्मा, रामदास बोंबटकर, अशोक नानकदे, कैलाश डोबे, अभिमन्यू भागात, राजेंद्र सरसर, गणेश दांडगे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष मोहित सरप पाटील , परिकशीत ठाकरे, उमेश येऊल, पांडुरंग मिसाळ, गणेश दांडगे, प्रकाश बगाडे, शुभम चंडले, उमेश हिस्सल, अनिल ढगे, गोटू खत्ती, शरद खवणे, अजय वांडले,कैलास सोनोन, राजेश वकोडे, विजय तांदळे, चंद्रकांत माटे, प्रशांत पाटील, संतोष दोबे, शंकर धूर्डे, राजू कपले, योगेश बोंद्रे, राजू तादे, गणेश अप्पा, बाळू चौव्हण, रामा इंगळे, रमेश कोथळकर, योगेश धर्मे, वैभव अंबडकार,तसेच भाजपा चे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
