महाराष्ट्र बालशिक्षण परिषद जळगाव जामोद केंद्र तसेच सहकार विद्या मंदिर व स्व.नारायण देवी साह कनिष्ठ महाविद्यालय दानापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दि. १३ नोव्हेंबर २०२५, गुरुवार रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा १४ नोव्हेंबर रोजी असलेला जन्मदिवस, १५ नोव्हेंबर गिजूभाई बधेका यांचा स्मृतिदिन व महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचा स्थापना दिवस या त्रिवेणी संगमानिमित्त बालकलाविष्कार कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष आ. डॉ. किशोर केला सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बालशिक्षण परिषद जळगाव जामोद केंद्राच्या अध्यक्षा तसेच सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद,वरवट बकाल, दानापूर तसेच पिंपळगाव काळे शाळेच्या मुख्य संयोजिका आदरणीय डॉ. सौ.स्वाती केला,स्थानिक संचालन राधेश्याम साह, बुलढाणा अर्बन दानापूरचे शाखाधिकरी सुहास जाणे सर, स्व.नारायणी देवी साह कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र घायल सर, सहकार विद्या मंदिर चे प्राचार्य राजेश लोहिया सर ,सुपरवायझर सौ.सुनीता कोरडे मॅडम उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले . आदरणीय डॉ. सौ.स्वाती केला मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बालशिक्षणतज्ञ गिजुभाई बधेका व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विचार, आजची बालके उद्याचे उज्ज्वल भवितव्य असून त्यांना पालकांनी कसे घडवावे, तसेच महाराष्ट्र बालशिक्षण परिषद हे ३ ते ८ वर्ष वयोगटातील मुलांच्या विकासाकरिता कसे कार्य करत आहे हे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले . शाळेचे प्राचार्य लोहिया सर यांनी संस्थेतर्फे शाळेत सुरु असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाबद्दल माहिती व या बदलत्या काळात शिक्षक, विद्यार्थी व पालक यांची विद्यार्थी विकासात असलेली मोलाची भूमिका याबद्दल आपले विचार प्रगट केले.बालकलाविष्कार अंतर्गत आनंद मेळावा, हस्तकला दालन व बालक पालक खेळानंदचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या हस्तकलेतुन साकार पंडित जवाहरलाल नेहरू व गिजूभाई बधेका दालनाचे उद्घाटन मागील वर्षी आपल्या शैक्षणिक वर्षात प्राविण्य प्राप्त विद्यार्थी प्रसन्न गणेश राऊत व कु. धनश्री योगेश भगत, आ. डॉ.सौ.स्वाती केला मॅडम ,श्री .राधेश्यामजी साह,श्री.जाने साहेब, प्राचार्य घायल सर, प्राचार्य लोहिया सर, पर्यवेक्षिका कोरडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. या दालनामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनेतून बनविलेल्या वस्तू, विविध चित्र, Teaching Aids, धान्यापासून तयार केलेले अल्फाबेट अश्या विविध हस्तकलेचे प्रदर्शन करण्यात लावण्यात आले.
मुलांना आनंद मेळावाच्या माध्यमातून खरी कमाईचे महत्व तसेच त्यांचे गणितीय कौशल्य वाढवण्यास होणारी मदत याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी आनंद मेळाव्यात विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावत व ते पदार्थ कुठल्याही प्रकारची मदत न घेता, पूर्ण स्वच्छता ठेवत व नीटनेटकेपणाने ठेवत स्वतः विकली. अतिशय स्वादिष्ट व्यंजनांचा, पदार्थांचा आस्वाद सर्व विद्यार्थी, अतिथीगण, पालक व शिक्षक यांनी घेतला.बालक पालक खेळानंद यामध्ये अतिशय उत्सुकतेने सर्व पालकांनी सहभाग घेतला. बालक पालक खेळानंद च्या माध्यमातून पालकांना आपल्या पाल्या सोबत खेळण्याचा आनंद तसेच आपले बालपण जगण्याचा आगळा वेगळा अनुभव मिळाला. उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविलेल्या सर्व पालक व बालक यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन श्री.पाटील सर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन श्री.चौबे सर यांनी केले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, पालक यांच्या उपस्थितीत निसर्गरम्य वातावरणात, अतिशय आनंदात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
