हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड येथील तरुणाने थेट भूमिहीन शेतमजुराची व्यथा मांडली व मुख्यमंत्री महोदयांना सोशल मीडियाद्वारे प्रश्नन केला असून राजकीय नेत्यांना सुद्धा विचारले जात आहे, आता निवडणूक आली,तुम्ही सामान्य जनतेचे भूमिहीन मजुरांचे सर्वांचे मते गोळा करता व निवडून येता,व स्वतःचा स्वार्थ साधून घेता,परंतु कधी भूमिहीन मजुरांकडे लक्ष केंद्रित करता, का असा सवाल येथे उचलला?
हा भूमहीन मजूर विचारतो मुख्यमंत्री साहेब आपणास विनंतीपूर्वक निवेदन सादर करण्याचे कारण, असे आहेत आपल्या राज्यात आपण ओला दुष्काळ जाहीर केला कारण शेतकऱ्याचे नुकसान झालं तुम्ही शेतकऱ्यांना पैसे देण्याचा निर्णय घेतला त्याच्यात आम्ही दुखी नाही आम्ही आनंदितच आहोत पैसे शेतकऱ्याला दिलेच पाहिजे कारण शेतकरी हा देशाचा कणा आहे परंतु महोदय तुम्ही सर्व नुकसानग्रस्त लोकांना मदत जाहीर केली परंतु भूमिहीन शेतीमध्ये काम करणारा घाम गाळणारा हात मजूर ज्याच्याकडे शेती नाही तो शेतीमध्ये काम करून आपलं व आपल्या परिवाराचं पोट भरतो त्याला मात्र दुर्लक्षित करण्यात आलं असा अन्याय का भूमीहीन शेतमजुराच्या सर्व सरकारी योजना चा लाभ सर्व जनता घेतं आहे ज्याच्याकडे जमिनी आहेत ते सुद्धा त्याचा लाभ घेतात आम्हाला तरीही काही प्रॉब्लेम नाही परंतु त्यांना देत असताना थोडं फार भूमिहीन शेतमजुराला सुद्धा दिल पाहिजे हे सरकारला का समजत नाही भूमीहीन शेतमजुराचा विषय कुठेही घेतला जात नाही राज्यसभा असो लोकसभा असो विधानसभा असो कुठेही त्याचा विषय सुद्धा घेतला जात नाही शेतकऱ्याचा विषय मात्र सतत घेतला जातो त्याच्यात आम्हाला काही प्रॉब्लेम नाही विषय शेतकऱ्याचा घेतलाच पाहिजे परंतु शेतकऱ्यांचा विषय घेत असताना भूमीहीन शेतमजुराचा सुद्धा विषय त्याच्यासोबत लावून धरला पाहिजे
सरकारी नोकरदारांना वेतन लागू होतात परंतु ज्यांचं हातावर पोट आहे मात्र ते अजून सुद्धा अंधारातच आहे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईला विचारात धरून त्यांना महागाई भत्ता देण्यात येतो परंतु शेतकरी आणि भूमीहीन शेतमजुरांना मात्र काही मिळत नाही विचार हा समान दृष्टीने झाला पाहिजे काही लोकांना आनंदी करणे आणि काही लोकांना सुखी ,करणे हे एका प्रकारचे पापच आहे असं महोदय ,तुम्हाला वाटत नाही काय भूमिहीन शेतमजूर ज्या व्यक्तींकडे शेतीसाठी जमीन नसते आणि ते दुसऱ्याच्या शेतात किंवा इतर मजुरीची कामे करून जीवन जगतात, त्यांना , सरकार दुर्लक्षित का करते त्याच्यावर खूप मोठा विचार करण्याची गरज आहे सलून व्यवसाय इस्त्री करणे ,चभार ,कुभार, लोहार, या छोट्या मोठ्या जाती छोटे छोटे उद्योग करतात त्यांना सुद्धा दुर्लक्षित करण्यात येते असं का , मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला विनंती करत आहे की भूमीहीन शेतमुजराकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ज्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं त्याच प्रकारे थोडं का होईना भूमिहीन शेतमजुरांना सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे कारण शेतीमध्ये काम नसल्यामुळे , त्यांना सुद्धा घरी राहावं लागलं आज राशन मध्ये सुद्धा जवारी आणि तांदूळ मिळाले यावर्षी कीड ,सुद्धा मिळाली नाही असं का होत आहे याच्यावर खूप गंभीर तिने विचार करायला हवा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्वांचा सर्व परी विचार केला ग्रामगीता या ग्रंथामध्ये त्यांनी सर्वांसाठी लिहिलं सर्वांना समान दृष्टिकोनाने पाहिलं पाहिजे हे त्यांचे शब्द पूर्ण महाराष्ट्राने ऐकले परंतु त्याच्यावर आज आपला महाराष्ट्र चालत नाही हे कुठेतरी या महाराष्ट्राला लागलेली खंत आहे , महोदय,मी तुम्हाला हात जोडून विनंती भूमी शेतमजुराकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यांच्यावर कोणी बोलत नाही त्यांच्यावर सुद्धा बोलण्याची गरज आहे त्यांना सर्व सुविधा मिळत नाही त्यांना सुद्धा सुविधा मिळाल्या पाहिजेत याच्यावर विचार करण्याची गरज आहे छोटे-मोठे उद्योग हे सुद्धा तुमच्याकडे अपेक्षने बघत आहे त्यांच्यावर सुद्धा विचार करण्याची गरज आहे , आणि सर्व राजकीय पुढारी यांना सुद्धा मी विनंती करत आहे की भूमिहीन शेतमजुराचा विषय तुम्ही राज्यसभा असो लोकसभा असो विधानसभा असो याच्यामध्ये घेतला पाहिजे कारण भूमीहीन शेतमजूर सुद्धा या देशाला मतदान करतो , त्या कारणाने तो सर्व सरकारी योजनेचा मानकरी आहे त्यांच्यावर तुम्ही सर्वांनी बोलायला हवं भूमीहीन शेतमजुराची लागू झालेली योजना आहे त्यांनाच मिळाली पाहिजे शेतकऱ्याची योजना ही त्यांना मिळाली पाहिजे जी योजना ज्या ज्या लोकांसाठी जाहीर होते त्या त्या लोकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे याच्यावर कुठेतरी सरकारने विचार केला पाहिजे तरच त्या लोकांना त्याचा योजनेचा भरपूर प्रमाणात फायदा होईल हा सुद्धा सरकारने विचार करायला हवा.. मी आशा करतो की सरकार याच्यावर विचार करेल आणि भूमीहीन शेतमजुरांना सुद्धा काहीतरी मिळेल अशी सरकारकडून सर्व लोकांची अपेक्षा आहे,ज्या युवकाने व्यथा मांडली तो युवक आहे,अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील रहिवाशी निवृत्ती श्रीकृष्ण तायडे या २५ वर्षे तरुणाने थेट महाराष्ट राज्य मंत्री यांना भूमिहीन मजुराची व्यथा व्यक्त केली,आता याकडे सर्वाचे लक्ष लागले मजुरांना कोणती शासकीय व्यजना फायदेशीर ठरते व शासकीय काय सवलती प्राप्त होतील,
