“ गंमत जंमत करुनी सारे
हसतील नाचतील इथे बालक
दौलत राष्ट्राची ही रक्षिण्या
होवुया सज्ज आपण पालक”
जळगाव जामोद प्रतिनिधी—
केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर तसेच महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद जळगांव जामोद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे आयोजित“बालकलाविष्कार २०२५” हा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला. बालकांनी बालकासाठी बालकांचा केलेला कार्यक्रम म्हणजे बालकलाविष्कार कार्यक्रम होय. शाळेच्या परिसरात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत बालक पालक खेळानंदाच्या माध्यमातून विविध खेळ हे नर्सरी ते चौथीच्या बालक व पालकांसाठी आणि ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांचे स्वादिष्ट पदार्थांचा आनंदमेळावा आयोजित केला होता. ह्या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे अध्यक्ष माननीय डॉ. किशोरजी केला सरांच्या मार्गदर्शनाने केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे आधारस्तंभ किसनलाल केला उर्फ काकाजी यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र बालशिक्षण परिषद जळगांव जामोद केंद्राच्या अध्यक्षा व शाळेच्या मुख्य संयोजिका डॉ. स्वाती किशोर केला, व प्रमुख उपस्थिती म्हणून चतुर्भुज केला, तसेच बाल दिनाचे औचित्य साधून शाळेची प्राईम मिनिस्टर कु. तनवी राजेश केदार , इयत्ता 4 थी तील गुणवंत विद्यार्थी कुमारी अनया विनोद पिंजरकर आणि रुद्र राधेश्याम राठी तसेच प्राचार्य विनायक उमाळे सर, विनोद ईश्वरे सर, प्राचार्य राजेश लोहिया सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.काकाजींनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शाळेच्या व महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या विविध उपक्रमांचे, शिक्षकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना सत्कर्माचे, परिवाराचे महत्व ही समजावले.आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून आदरणीय डॉ. सौ स्वातीताई केला यांनी विद्यार्थ्यांमध्ये 5 C's म्हणजेच Communication(संवाद) , Cooperation (सहकार्य), Citizenship (नागरिकत्व), Creativity (निर्मितीशीलता), Critical Thinking (तर्कशुद्ध विचार ) या पंच कौशल्यातून विद्यार्थ्यांचा होणारा सर्वांगीण विकास आणि भविष्याची पायाभरणी याबद्दल अमूल्य विचार मांडले. ह्याच विषयावर होणाऱ्या महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या अधिवेशनात सहभागी होण्याचे आव्हान ही केले. तसेच बालदिना निमित्त विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.प्राचार्य राजेश लोहिया सरांनी बालकलाविष्कार कार्यक्रमाचे उद्दिष्ट, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठीचे या कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून शाळेत वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमामांची माहिती दिली.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत सर्जनशीलता, क्रीडा आणि सहकार्याची भावना यांचा सुंदर मेळ घडवून आणला. संकल्पनात्मक खेळातून आनंदाने देखील कसे शिक्षण होऊ शकते हे बालक पालक खेळानंदातून पालकांच्या लक्षातही आले आणि त्यांनी त्याचा आनंदही घेतला. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुलांचे मनोबल वाढवले.आनंद मेळाव्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये गणितीय कौशल्ये, भाषिक, व्यावसायिक कौशल्य ची भर पडावी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी हा असून, आजच्या कार्यक्रमाने तो यशस्वीपणे साध्य झाल्याचे सर्वांनी नमूद केले. आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांची विक्री करण्यात आली, यामधून शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी विशेष आस्वाद घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग नववीच्या विद्यार्थिनी कु. श्रेया रमेश अढाऊ व सानिका अरुण ताडे या विद्यार्थिनींनी केले. तसेच बाल दिना विषयी माहिती ही इयत्ता नववी नववीची विद्यार्थिनी समीक्षा शहाजी खराटे, गिजुभाई बधेका यांच्या बद्दल माहिती कु. वेदा नितीन तडस हिने दिली. महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेची माहिती दिली. त्याचबरोबर सिंधुताई सपकाळ यांच्या जन्मदिनानिमित्त प्रगती गायकी मॅडम यांनी माहिती दिली. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ही नववीची विद्यार्थिनी कु. भक्ती मंगेश महाले हिने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका शुभांगी बैरागी,प्रगती गायकी, प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
