अध्यक्षपदाचे ४ उमेदवार व सदस्य पदाच्या १७ उमेदवारांची निवडणूक प्रक्रियेतून माघार...नगरपरिषद निवडणुकीचे चित्र होणार स्पष्ट.


 अध्यक्षपदाचे ४ उमेदवार व सदस्य पदाच्या १७ उमेदवारांची निवडणूक प्रक्रियेतून माघार...नगरपरिषद निवडणुकीचे चित्र होणार स्पष्ट...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

जळगाव जामोद नगर परिषद निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असल्याची चित्र सध्या दिसत असून, नगरपरिषद निवडणुकीचा ज्वर चांगला चढत आहे.ऐन कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. दिनांक २१ नोव्हेंबर हा दिवस उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून ४ उमेदवारांनी माघार घेतली तर १७ सदस्य पदाचे उमेदवारांनी ही आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण २१ उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले असून यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून शिवसेना उ.बा.ठा च्या पवन गजानन अवचार सह अपक्ष उमेदवार अजय पिराजी वानखडे, मंगेश रामेश्वर माटे, विजय रामनाथ तांदळे यांनी माघार घेतली तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अनिल शंकर इंगळे, शिवसेना उ.बा.ठा चे रमेश मारोती ताडे, अपक्ष उमेदवार नागेश किसन भटकर, अपक्ष उमेदवार मंगेश माटे, अपक्ष उमेदवार निकिता गोपाल वानखडे, पक्ष उमेदवार अंकिता विशाल वानखडे, काँग्रेस च्या उमेदवार माधुरी गोपाल सावतकार, अपक्ष उमेदवार सविता रमेश खिरोडकार, अपक्ष उमेदवार प्रेरणा गणेश सोनटक्के, अपक्ष उमेदवार पवन गोंड, अपक्ष उमेदवार संदीप मोरे, काँग्रेसचे उमेदवार गोपाल कोथळकार, अपक्ष उमेदवार शेख सलीम शेख इस्माईल, अपक्ष उमेदवार अनिल ढोकणे, शिवसेना उ.बा.ठा च्या उमेदवार पूजा ईश्वर वाघ, काँग्रेस उमेदवार सय्यद हुसेन सय्यद बशीर, काँग्रेस उमेदवार खान समीना परवीन शाकीर खान या १७ उमेदवारांनी आपले सदस्य पदाचे नामांकन मागे घेतल्या असून नगरपरिषद निवडणूक लढतीची चित्र स्पष्ट झाले आहे. जळगाव जामोद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार गजानन  सूर्यवंशी, अपक्ष उमेदवार संजय पारवे, भाजपचे उमेदवार गणेश दांडगे तर वंचित आघाडीचे उमेदवार सुधीर पारवे हे निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

Previous Post Next Post