३१ हजार ६०० रूपयांचा गांजा पकडला..जळगाव जामोद पोलीसांची कारवाई...आरोपी अटकेत...


 ३१ हजार ६०० रूपयांचा गांजा पकडला..जळगाव जामोद पोलीसांची कारवाई...आरोपी अटकेत...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाई करण्यात येत असून अशीच कारवाई जळगाव जामोद शहरात करण्यात आली आहे. जळगाव जावई पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पीएसआय प्रशांत झेंडगे गोपनीय माहिती मिळाली की दोन तरुण मुले गांजा विक्रीसाठी घेऊन येत आहेत. अशा माहितीवरून आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता.दिनांक १९ नोव्हेंबर रोजी गुप्त माहिती मिळाल्यानुसार दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचे ताब्यातून १ किलो ५८० ग्रॅम गांजा किंमत अंदाजे २० हजार रुपये प्रति किलो प्रमाणे ३१ हजार ६०० रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला.गांजा विक्री करणारे आरोपी जळगाव जामोद शहरातील आहेत आरोपीचे नाव विशाल संदीप सोनोने वय २४ वर्ष राहणार गौतम नगर जळगाव जामोद , अंकुश अशोक वानखडे वय २२ वर्ष राहणार भोपाल हल्ली मुक्काम गौतम नगर जळगाव जामोद या दोघांनाही शहरातील आठवडी बाजारामधून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात दिनांक २० नोव्हेंबर रोजी अप क्र.५५५/२०२५ कलम ८(क),२०(२)(ब),२९ एन.डी.पी.एस अॅक्ट १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय प्रशांत झेंडगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश पुंडे, हेड कॉन्स्टेबल गजानन मानकर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर ढोण यांचे सह जळगाव जामोद आगाराचे वाहतूक निरीक्षक पियुष पाटकर यांनी केली आहे. पुढील तपास नारायण सरकटे करीत आहेत.

Previous Post Next Post