राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी उद्याचा सुसंस्कृत नागरिक घडवीणार.राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
समता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव बाजार येथे दिनांक २४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे श्रम संस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा ग्राम पळशी सुपो येथे पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा आनंद धुंदाळे उद्घाटक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना बुलढाणा कार्यक्रमाधिकारी प्रा. निळकंठ राठोड, प्रमुख मान्यवरांमध्ये ग्राम पळशी सुपो च्या सरपंच नंदाताई गणेश काकडे, प्रा.आटोळे सर उपस्थित होते.या सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने वरील संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरात विविध बौद्धिक सत्र, आरोग्य साधना, हुंडाबळी साक्षरता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण जनजागृती, स्वयंशिस्त यासारख्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन ठरलेले आहे.राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी हा उद्याचा सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी मोलाची भूमिका पार पडणार असल्याचे प्रतिपादन निळकंठ राठोड यांनी व्यक्त केले. माणसाला माणूस पण जपण्याची शिकवण या शिबिरातून दिली जाते. त्यामुळे सामाजिक मूल्य वाढीस लागते. असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रा.आनंद धुंदाळे यांनी मांडले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुप्रिया इंगळे तर प्रास्ताविक प्राचार्य विद्या काटले यांनी केले. कार्यक्रमाला प्रा माहेश्वरी वाघमारे, प्रा.योगेश वारूकार, प्रा. प्रणय खोब्रागडे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनचे स्वयंसेवक उपस्थित होते. असे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. शरद गावडे यांनी कळविले आहे. कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार प्राध्यापक रवींद्र निमकर्डे यांनी मानले.
